प्रत्येक नोकरदार व्यक्तीला त्याच्या पगाराचा काही भाग कराच्या रूपात सरकारला द्यावा लागतो. 2021- 2022 हे आर्थिक वर्ष संपणारे आहे. अशा परिस्थितीत कर वाचवण्याची ही शेवटची संधी आहे. जर एखाद्या व्यक्तीने योग्य प्रकारे गुंतवणूक केली तर त्याला त्यांच्या 10 लाख रुपयांच्या वार्षिक पगारावर एक रुपयाही कर भरावा लागणार नाही. तुम्ही ही कर बचत पद्धत 2022- 2023 या आर्थिक वर्षासाठी लागू करू शकता. यामुळे तुम्हाला दोन फायदे होतील. प्रथम, तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळेल. याच्या मदतीने तुम्ही भविष्यासाठी चांगले नियोजन करू शकाल. तर 10 लाख रुपयांच्या वार्षिक पगारावर करबचतीचा फायदा कसा घ्यावा हे समजून घेऊया.जसे की, तुम्ही 40 वर्षांचे आहात आणि तुमचा पगार 10.5 लाख रुपये आहे. त्यामुळे आयकर स्लॅबनुसार तुम्ही 30 टक्के टॅक्स स्लॅबमध्ये येतो. यामुळे तुमची कर सूट (Tax Saving) मिळविण्यासाठी तुम्ही राष्ट्रीय पेन्शन योजनाच्या पर्यायामध्ये गुंतवणूक करू शकता.
* नॅशनल पेन्शन सिस्टिममध्ये गुंतवणूकिवर तुम्हाला कर सवलत मिळेल-
नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला इनकम टॅक्स (Income Tax) 80 Cअंतर्गत 1.5 लाख रुपयांच्या कर सूटचा लाभ मिळेल. या विभागाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही EPF,PPF, मुलांचे शिक्षण, इत्यादी दाखवून याचा लाभ घेऊ शकता. यानंतर सरकारच्या राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये गुंतवणूक करून 50 हजार रुपयांच्या अतिरिक्त कर सूटचा लाभ घ्या. यानंतर तुमचा वार्षिक पगार 8.5 लाख शिल्लक आहे. यानंतर तुम्हाला स्टँडर्ड डीडक्शन म्हणून 50 हजार अधिक मिळतील आणि तुमचा एकूण पगार 8 लाख रुपये होईल.
* होमलोनवर मिळेल फायदा
इनकम टॅक्सच्या नियमानुसार सर्वात जास्त लाभ होम लोनवर मिळतो. होम लोनमध्ये कर्जाची रक्कम आणि व्याज दोन्हीवर विविध कर सुट उपलब्ध आहेत. इनकम टॅक्स कलम 24B अंतर्गत, तुम्ही होम लोनवर 2 लाख रुपयापर्यंतच्या कर सवलतीचा दावा करू शकता. यानंतर तुमचा एकूण 6 लाख रुपये पगार शिल्लक राहतो.
* आरोग्य विम्यावरील फायदे
यानंतर तुम्ही स्वत: साठी आणि कुटुंबासाठी आरोग्य विमा खरेदी करता. यामध्ये तुम्हाला 25,000 रुपयापर्यंत कर सवलतीचा लाभ मिळेल. याशिवाय तुम्ही तुमच्या वर्षावरील पालकांसाठी आरोग्य विमा खरेदी केल्यास तुम्हाला 50 हजार रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळेल. तुमचा एकूण पगार 5.25 लाख रुपये आहे. यानंतर तुम्ही वर्षाभरात 25 हजार रुपये दान करा, मग त्यावरही दावा करा. यानंतर तुमची एकूण रक्कम 5 लाख झाली. तुमच्या 2.5 लाखांच्या उत्पन्नावर 5 टक्के दराने 12,000 रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. जर सरकारने 12,500 रुपयांचे दायित्व माफ केले असेल तर तुम्हाला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.