अमेरिकेतील (America) इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाला (Tesla) भारत सरकारकडून मोठा झटका बसला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भारत सरकारने एलोन मस्कची (Elon Musk) आयात शूल्कात सूट देण्याची मागणी फेटाळून लावली आहे. एलोन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश आहेत.
सरकारच्या मते, देशाचे नियम आधीच उत्पादकांना अंशत: तयार केलेली वाहने देशात आणण्याची परवानगी देतात. त्याच वेळी, तुम्ही स्थानिक कर भरून असेंब्लीचे काम देखील करू शकता. सेंट्रल बोर्ड ऑफ अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क (CBDT) चे अध्यक्ष विवेक जोहरी म्हणाले," आम्ही या मुद्द्यावर विचार केला आहे. आयात शुल्क हा परदेशी कंपन्यासाठी अडथळा नाही. सध्याची आयात शुल्क रचना असूनही, देशात गुंतवणुकीचा ओघ सुरूच आहे. "विवेक जोहरीच्या म्हणण्यानुसार, टेस्लाने अद्याप भारतातील (India) स्थानिक उत्पादन आणि खरेदी योजनाबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
मस्कची समस्या:
टेस्लाचे सीइओ एलोन मस्क (Elon Musk) यांनी भारत सरकारकडे आयात शुल्क कमी करण्याची मागणी केली होती. यापूर्वी मस्कने असेही म्हटले होते की भारतात उत्पादन लॉच करण्यासाठी त्यांना सरकारी पातळीवर अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मात्र, त्यानंतर तेलंगणासह विविध राज्यांनी मस्कला प्लांट उभारण्यासाठी आमंत्रित केले.
* किती आहे आयात शुल्क
एलोन मस्क (Elon Musk) म्हणतात की, भारतातील आयात शुल्क जगातील कोणत्याही मोठ्या देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. भारतात आयात केलेल्या कारवार सध्या 60 ते 100 टक्के शुल्क आकारले जाते. या कपात करण्याची मागणी एलोन मस्क करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.