Buy Now Pay Later: पैसे न भरता करा मनमुराद खरेदी; कसं होईल शक्य?

तुमच्याकडे पैसे किंवा क्रेडिट कार्ड नसले तरी तुम्ही सहज रित्या खरेदी करू शकता. अनेक ई-कॉमर्स कंपन्या 'Buy Now Pay Later' ची सध्या सुविधा देत आहेत.
Buy Now Pay Later
Buy Now Pay LaterDainik Gomantak
Published on
Updated on

तुमच्याकडे पैसे किंवा क्रेडिट कार्ड नसले तरी तुम्ही सहज रित्या खरेदी करू शकता. अनेक ई-कॉमर्स कंपन्या 'Buy Now Pay Later' ची सध्या सुविधा देत आहेत. या अंतर्गत कंपन्या शॉपिंगसाठी तुम्हाला कर्ज देतात. ही सुविधा अशा लोकांसाठी फायदेशीर आहे ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड नाही आणि त्यांना अचानकच काहीतरी खरेदी करावे लागते. (E commerce companies are currently offering Buy Now Pay Later)

Buy Now Pay Later
महिला दिनी पत्नीच्या नावाने करा खास योजनेत गुंतवणूक, दरमहा मिळणार 44हजार रुपये

सहसा यामध्ये खरेदी मर्यादा 2000 ते 25000 रुपयांपर्यंतची असते. काही कंपन्या 60,000 रुपये किंवा 1 लाख रुपयांपर्यंतही मर्यादा देतात. या व्याजमुक्त कर्ज सुविधेतून तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करू शकता आणि काही दिवसांनी पैसे परत देऊ शकता.

काही सेकंदातच कर्ज मिळवा

BNPL मध्ये खरेदीसाठी काही सेकंदात कर्ज तुम्हाला उपलब्ध होते. ई-कॉमर्स वेबसाइटवरती खरेदी केल्यानंतर पेमेंट ऑप्शनमध्ये तुम्हाला हा पर्याय दिसेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर पॅन कार्डसह (PAN Card) काही माहिती विचारली जाईल, त्यानंतर डिजिटल केवायसीनंतर तुमचे कर्ज मंजूर होईल. यामध्ये कर्ज देणाऱ्या कंपनीने किती कर्ज मंजूर केले आहे, हे मेसेजद्वारे तुम्हाला सांगितले जाईल.

Buy Now Pay Later
FD करताय मग फक्त व्याजाला बळी पडू नका, 'हे' देखील 5 फायदे लक्षात घ्या

क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक कर्जापेक्षा हे स्वस्त

हे क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक कर्जापेक्षा खुप स्वस्त आहे. क्रेडिट कार्ड कंपन्या निर्धारित कालावधीनंतर 48 टक्क्यांपर्यंत व्याज आकारतात, तसेच वैयक्तिक कर्ज कंपन्या प्रक्रिया शुल्कासह 24 टक्क्यांपर्यंत व्याज आकारतात. BNPL मध्ये 24 टक्के पर्यंतचे व्याज आकारले जाते.

व्याजासह दंड भरावा लागेल

या सुविधेचा लाभ घेतल्यानंतर ग्राहकांनी वेळेवर पैसे भरणे आवश्यक आहे, जर असे करण्यात अयशस्वी झाल्यास थकित रकमेवर 24 टक्के व्याजाचा दंड होऊ शकतो. त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही वाईट परिणाम होतो. एका अहवालानुसार 2025 पर्यंत देशातील Buy Now Pay Later मार्केट 7.41 लाख कोटींपर्यंत वाढू शकते, असं दर्शवण्यात आलं आहे.

Buy Now Pay Later
व्यावसायिकांनाही सहज गृहकर्ज मिळू शकते

Buy Now Pay Later म्हणजे काय आहे?

तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नसले आणि खात्यात पैसे नसले तरीही तुम्ही मनमुराद खरेदी करू शकता. यामध्ये खरेदी केल्यापासून पुढील 14 ते 30 दिवसांतच पैसे भरावे लागतात. तुम्ही पेमेंट रक्कम ईएमआयमध्ये देखील रूपांतरित करू शकता.

गरज असेल तेव्हाच याचा फायदा घ्या

BankBazaar.com चे CEO आदिल शेट्टी म्हणतात की BNPL मध्ये कर्ज सहज उपलब्ध झाल्यामुळे लोक त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त खरेदी करू शकतात, ज्यामुळे कर्जाची परतफेड करणे तुम्हाला कठीण होईल. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे थकबाकीची रक्कम वेळेवर भरणे असते. अन्यथा, तुमच्यावर कर्जाचे भलेमोठे ओझे होईल. त्यामुळे गरज असेल तेव्हाच या सुविधेचा वापर करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com