म्युच्युअल फंड मधून पैसे काढताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

बाजारात मोठी घसरण झाली असेल, तर घाबरून गुंतवणूक काढू नका
Mutual Fund
Mutual FundDainik Gomantak
Published on
Updated on

सध्या म्युच्युअल फंड (Mutual fund)आणि शेअर मार्केटमध्ये ग्राहक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. आणि ही गुंतवणूक अत्यंत कमी रकमेतून बचत सुरू करण्याचा उत्तम पर्याय म्युच्युअल फंड सोबतच शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणूक करण्याची सुविधा सुध्दा देते. तेही अत्यंत कमी जोखीम घेऊन. मात्र यातून केलेली गुंतवणूक काढतांना तुमचे आर्थिक उद्दिष्ट आणि गुंतवणुकीचा कालावधी यासह इतर काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे, अन्यथा नफ्याऐवजी तोटाच जास्त होऊ शकतो.

Mutual Fund
'या' क्रेडिट कार्डांवर मिळतोय उत्तम कॅशबॅक

म्युच्युअल फंडमध्ये टॅक्स चे ईव्ह्याल्युवेशन हे शेअर्सप्रमाणेच केले जाते. यामध्ये, एक वर्षापूर्वी पैसे काढण्यावर 15 टक्के दराने अल्पकालीन जमा झालेल्या रकमेवर नफा कर आकारला जातो. तर एक वर्षानंतर पैसे काढण्यावर कोणताही कर (Tax)आकारला जात नाही. तर डेट फंड मध्ये, तीन वर्षापूर्वी पैसे काढण्यावर 15 टक्के कर आणि तीन वर्षांनंतर पैसे काढण्यावर इंडेक्सेन सह 20 टक्के कर आकारला जातो. अशा परिस्थितीत, लॉकिंग कालावधी किती आहे हे खूप महत्वाचे असते .

गुंतवणुकीचे ध्येय काय आहे

जर म्युच्युअल फंडात(Mutual Fund)तुम्ही पाच वर्षांनी मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घर खरेदीसाठी गुंतवणूक केली असेल आणि अंदाजे परतावा निश्चित केला असेल, तर पैसे काढण्यापूर्वी नक्कीच त्याचे मोजमाप करा. जे ने करून तुम्हाला अपेक्षित असलेला परतावा मिळाला आहे हे पाहता येईल. तसेच,पैसा नफा-तोटा पाहूनच तेव्हाच काढा जेव्हा तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घर खरेदीसाठी आवश्यक आहे.

घाबरून गुंतवणूक काढू नका

मार्केट दर हे चढ - उतार होणे हे त्याचे नैसर्गिक रूप आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही इक्विटी फंडात गुंतवणूक (Investment) केली असेल आणि बाजारात मोठी घसरण झाली असेल, तर घाबरून गुंतवणूक काढू नका. तर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की उलट अशा संधींकडे गुंतवणूक वाढवण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे. याशिवाय,वेळोवेळी तुमच्या पोर्टफोलिओचे स्वतः मूल्यांकन करा किंवा आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com