Dollar vs Rupee
Dollar vs RupeeDainik Gomantak

Dollar vs Rupee: डॉलरच्या तुलनेत रुपया 80 वर पोहोचला

डॉलरच्या तुलनेत आता रुपया 80 च्या जवळ पोहोचला आहे.
Published on

डॉलरच्या तुलनेत आता रुपया 80 च्या जवळ पोहोचला आहे. सोमवारी भारतीय चलन 15 पैशांनी घसरून 79.97 वर बंद झाला. सकाळच्या व्यवहारात शेअर बाजारात देशांतर्गत चलनाला बळ मिळाले आणि त्यामुळे सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात रुपया 6 पैशांनी वाढून 79.76 वर उघडला. (Dollar vs Rupee The rupee touched 80 against the dollar)

Dollar vs Rupee
SpiceJetच्या विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल, विमानसेवा थांबवण्याची मागणी

व्यापार्‍यांनी सांगितले की परदेशात अमेरिकन चलनाची मजबूती आणि विदेशी भांडवलाचा प्रवाह यामुळे रुपयाचा नफा मर्यादित झाला आहे. आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 79.76 वर उघडला, मागील किंमतीच्या तुलनेत 6 पैशांनी वाढ दर्शवित आहे.

सुरुवातीच्या सौद्यांमध्ये, रुपया 79.72 च्या उच्च आणि 79.81 च्या नीचांकी पातळीवर गेला आहे. मागील सत्रामध्ये शुक्रवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 17 पैशांनी वाढून 79.82 वर बंद झाला होता.

Dollar vs Rupee
Kisan Vikas Patra योजनेत 124 महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट, घ्या जाणून

दरम्यान, सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची स्थिती दर्शवणारा डॉलर निर्देशांक 0.26 टक्क्यांनी घसरून 107.77 वर आला आहे. जागतिक तेल निर्देशांक ब्रेंट क्रूड फ्युचर्स 0.71 टक्क्यांनी वाढून $101.88 प्रति बॅरल झाला आहे. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 1,649.36 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com