दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येउन ठेपली आहे. कोरोना (Corona) महामारीनंतर लोक निर्बंध मुक्त दिवाळी साजरी करणार आहेत. भारतीय शेअर मार्केटमध्ये दिवाळीनिमित्ताने सुट्टी असते. पण शेअर बाजारात 1 तासासाठी व्यवहार सुरू असतो. शेअर बाजारात दिवाळीनिमित्ताने ट्रेडिंग करण्याची ही परंपरा खूप जुनी आहे. या 1 तासाच्या ट्रेडिंगला 'मुहूर्त ट्रेडिंग' (Muhurat Trading) असे म्हणतात. या मुहूर्त ट्रेडिंगसाठी शेअर बाजारातील व्यवहार एक तासासाठी होतात. हे मुहूर्त ट्रेडिंग त्या दिवशी संध्याकाळी होते.
एक तासासाठी असतो शेअर बाजार
मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान एक तासात गुंतवणूकदार आपली छोटी गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक इक्विटी, इक्विटी फ्यूचर अॅण्ड ऑप्शन, करन्सी अॅण्ड कमोडिटी मार्केटमध्ये होते. यंदा दिवाळी 24 ऑक्टोबर 2022 रोजी आहे. या दिवशी शेअर शेअर मार्केट संध्याकाळी 6.15 ते 7.15 दरम्यान ओपन असणार आहे. या कालावधीत मुहूर्त ट्रेडिंग केली जाणार आहे.
जुनी परंपरा
शेअर बाजारात दिवाळीच्या (Diwali) दिवशी एक तासाचे ट्रेडिंग करण्याची परंपरा पाच दशकांहून अधिक जुनी परंपरा आहे. मुहूर्त ट्रेडिंग करण्याची परंपरा मुंबई शेअर मार्केटमध्ये 1957 आणि राष्ट्रीय शेअर बाजारात 1992 पासून सुरू झाली. मुहूर्त ट्रेडिंगच्या दिनी अनेकजण शेअर खरेदी करण्यावर भर देतात.
मुहूर्त ट्रेडिंग करणे शुभ मानतात
मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी ट्रे़डिंग करणे हे शुभ असल्याचे समजले जाते. या दिवशी ट्रेडिंग केल्याने समृद्धी येते आणि वर्षभर गुतंवणूकदारांकडे संपत्ती कायम येत राहते असे समजल्या जाते. मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी खरेदी करण्यात येणार शेअर्स अतिशय खास समजले जातात. दिवाळीच्या दिवशी नवीन काम सुरू करणे हे शुभ असते अशी एक धारणा आहे.
2021 मध्ये कसे होते मुहूर्त ट्रेडिंग
मागील वर्षी 4 नोव्हेंबर 2021 मध्ये मुहूर्त ट्रेडिंग झाली होती. या विशेष एक तासाच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्सने 60 हजार अंकांचा टप्पा गाठला होता. तर, निफ्टी 17,921 अंकांवर स्थिरावला होता. यंदाच्या वर्षात शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर चढ-उतार दिसून येत आहे. पण मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी सेन्सेक्स, निफ्टीमध्ये तेजी दिसून येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.