सुझुकीने लॉंच केलेल्या या स्कूटरला ग्राहकांची पसंती; महिलांसाठी उत्तम पर्याय

Suzuki Avenis : सुझुकी मोटरसायकल इंडियाने स्पोर्टी दिसणाऱ्या नवीन एव्हनिस स्कूटरचे स्टँडर्ड एडिशन लॉन्च केले आहे.
Suzuki Scooter
Suzuki ScooterDainik Gomantak
Published on
Updated on

Suzuki Avenis : भारतीय बाजारपेठेत कारपेक्षा दुचाकींना अनेक पटींनी जास्त पसंती दिली जाते. यामध्ये जेवढ्या बाईक विकल्या जातात तेवढीच ग्राहकांमध्ये स्कूटरची क्रेझ आहे. यामुळेच सुझुकी मोटरसायकल इंडियाने स्पोर्टी दिसणाऱ्या नवीन एव्हनिस स्कूटरचे स्टँडर्ड एडिशन लॉन्च केले आहे. (Customers prefer this scooter launched by Suzuki; Great choice for women)

Suzuki Scooter
आयकराच्या नियमात बदल हे 10 नवीन,1 एप्रिलपासून लागू झाले नविन नियम

नवीन स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 86,500 रुपये ठेवण्यात आली आहे, जी बेस मॉडेलच्या तुलनेत 200 रुपये स्वस्त आहे. या किंमतीसह, नवीन बेस व्हेरिएंट सुझुकी एव्हनिसचे सर्वात स्वस्त मॉडेल बनले आहे.

महिलांसाठी उत्तम पर्याय

सुझुकीचे म्हणणे आहे की, लॉन्च झाल्यापासून अवघ्या तीन महिन्यांत या स्कूटरला ग्राहकांकडून मोठी मागणी आली आहे, तरीही कंपनीने विक्रीचे आकडे उघड केलेले नाहीत. Suzuki Avenis मध्ये 125 cc इंजिन आहे जे FI तंत्रज्ञानासह येते. हे इंजिन 6750 rpm वर 8.7 PS पॉवर आणि 5500 rpm वर 10 Nm पीक टॉर्क बनवते. ही स्कूटर महिलांसाठी योग्य आहे कारण तिचे वजन फक्त 106 किलो आहे, ज्यामुळे ती सेगमेंटमधील सर्वात हलकी स्कूटर आहे.

सुझुकी मोटरसायकल इंडियाने नवीन Avensis स्कूटरसह व्हॅल्यू फॉर मनी फीचर्स दिले आहेत. स्कूटर एलईडी लाइटिंगसह येते ज्यामध्ये हेडलॅम्प तसेच टेललॅम्पचा समावेश आहे. Suzuki Avenis ला बाहेरून फ्युएल कॅप बसवण्यात आली आहे, त्यामुळे जेव्हाही तुम्ही स्कूटरमध्ये पेट्रोल भरता तेव्हा तुम्हाला स्कूटरमधून उतरून सीट उघडण्याची गरज नाही, बाहेरून पेट्रोल टाकले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com