Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सीने लोक करतायेत शॉपिंग; अमेरिकन अहवालातून खुलासा

Cryptocurrency: पूर्वीच्या काळी जेव्हा गुंतवणुकीच्या पर्यायांची चर्चा व्हायची, तेव्हा लोक सोने हा बेस्ट पर्याय मानायचे.
Binance a cryptocurrency exchange.
Binance a cryptocurrency exchange.Dainik Gomantak

Cryptocurrency: पूर्वीच्या काळी जेव्हा गुंतवणुकीच्या पर्यायांची चर्चा व्हायची, तेव्हा लोक सोने हा बेस्ट पर्याय मानायचे. एफडीपेक्षा चांगला परतावा देण्याचा सोन्याचा रेकॉर्ड दीर्घकाळापासूनचा आहे. त्यानंतर शेअर बाजाराची एन्ट्री झाली. आता लोक गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय म्हणून क्रिप्टोकरन्सीकडे पाहू लागले आहेत. काही लोक याकडे पारंपारिक गुंतवणूक म्हणून पाहतात, तर काही गुंतवणूकदार हा गुंतवणुकीचा बेस्ट पर्याय असू शकत नाहीत असे सांगतात. ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीच्या मॅरियट स्कूल ऑफ बिझनेसमधील फायनान्सचे सहाय्यक प्राध्यापक डॅरेन आयलो यांनी याबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे.

संशोधन काय सांगते?

आयलो यांनी सांगितले की, जर आपण क्रिप्टोला जुगारासारखे मानत असू तर लॉटरी विजेत्यांप्रमाणेच त्यामधून मिळालेल्या लाभाचा खर्च करु. याउलट, आमचे अंदाज असे दर्शवतात की क्रिप्टोमधून मिळणारा लाभ हा पारंपारिक इक्विटी गुंतवणुकीतून मिळणाऱ्या लाभासारखा आहे. यावर्षी स्पॉट-बिटकॉइन एक्सचेंज-ट्रेडेड फंड लॉन्च झाल्यानंतर हा विषय अर्थशास्त्रज्ञाचे लक्ष वेधणारा बनला. मार्चमध्ये फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनला रिसर्च पेपर सादर करणारे संशोधक देखील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी, एमोरी युनिव्हर्सिटी आणि इंपिरियल कॉलेज लंडनचे आहेत.

Binance a cryptocurrency exchange.
Cryptocurrency: ब्लॉकचेन तंत्रज्ञान म्हणजे काय, क्रिप्टोकरन्सी सोबत त्याचा काय संबंध?

रिटेलमध्ये क्रिप्टोचा वाढता वापर

त्यांनी 2010 ते 2023 पर्यंत 60 दशलक्ष लोकांचा डेटा वापरला, ज्यात लाखो बँक, क्रेडिट आणि डेबिट-कार्ड व्यवहार समाविष्ट आहेत. लोक क्रिप्टोद्वारे शॉपिंग देखील करत आहेत. दरम्यान, क्रिप्टो रियल मनीवर आधारित आहे की नाही याचे विश्लेषण करण्यासाठी संशोधकांनी अमेरिकेन अर्थव्यवस्थेतील त्याच्या विस्ताराबद्दल जाणून घेतले. 2023 च्या दशकात 16 टक्के कुटुंबांनी रिटेल क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमध्ये ठेवलेल्या ठेवींचे विश्लेषण केले. दरम्यान, खर्च आणि क्रिप्टो गुंतवणूक यांच्यातील संबंध जोडणे कठीण झाले, कारण काही लोकांनी त्यांच्या बचत वाढवण्याच्या आशेने सिक्युरिटीज सेगमेंटमध्ये गुंतवणुक केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com