Coal India: कोल इंडियाच्या कर्मचार्‍यांना मोठी भेट, भत्त्यांमध्ये एवढ्या टक्क्यांची वाढ!

Coal India share Price: तुम्ही स्वतः किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही कोल इंडिया लिमिटेड (CIL) चे कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Coal India
Coal IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Coal India share Price: तुम्ही स्वतः किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही कोल इंडिया लिमिटेड (CIL) चे कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

कोल इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने 2.38 लाख नॉन-एक्झिक्युटिव्ह कर्मचाऱ्यांसोबत वेतन सुधारणा करार केला असल्याचे सांगण्यात आले.

या बदलानंतर कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ होणार आहे. याबाबतची माहिती कोल इंडियाने शेअर बाजाराला दिली आहे.

शेअर बाजाराला दिलेली माहिती

कोल इंडिया लि.ने शेअर बाजाराला (Stock Market) दिलेल्या माहितीत असे सांगण्यात आले की, 1 जुलै 2021 पासून कराराअंतर्गत, 19 टक्के किमान हमी लाभ आणि मूळ वेतनावरील भत्ते, परिवर्तनशील महागाई भत्ता, विशेष कार्य भत्ता आणि उपस्थिती बोनसमध्ये 25 टक्क्यांनी वाढ केली.

कंपनीने सांगितले की, कोळसा उद्योगासाठी संयुक्त समिती (JBCCI)-11 ने राष्ट्रीय कोळसा वेतन सेटलमेंटला पाच वर्षांसाठी मान्यता दिली.

Coal India
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, महागाई भत्त्यात एवढ्या टक्क्यांची वाढ; आता पगार...

वेतन सेटलमेंट 1 जुलै 2021 पासून लागू होईल

या समितीमध्ये CIL मॅनेजमेंट, सिंगारेनी कॉलीरीज कंपनी लिमिटेड (SCCL), पाच केंद्रीय कामगार संघटना (BMS, HMS, AITUC, CITU आणि इंडियन नॅशनल माइन वर्कर्स फेडरेशन (INMF) यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

वेतन सेटलमेंट 1 जुलैपासून प्रभावी मानले जाईल. या करारामुळे CIL आणि SCCL च्या सुमारे 2.81 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होईल.

थकबाकी कधी मिळेल

कर्मचाऱ्यांच्या (Employees) पगारातील वाढ 1 जुलै 2021 पासून लागू होणार आहे. मात्र थकबाकीसह हे पैसे कर्मचाऱ्यांना कधी मिळणार याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

कर्मचाऱ्यांना त्यांच्या जूनच्या पगारासह हे पैसे मिळतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com