
जर तुम्ही सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रेनॉल्ट इंडिया आपल्या ग्राहकांना बंपर डिस्काउंट देत आहे. कंपनीने रेनॉल्ट डिस्कव्हरी डेज नावाची एक मोहीम सुरु केली आहे. ही मोहीम 6 जून ते 16 जून 2025 पर्यंत चालणार आहे. याचा अर्थ तुमच्याकडे केवळ 10 दिवस शिल्लक आहेत. तुम्ही कंपनीच्या सीएनजी कारवर तगडा डिस्काउंट मिळवू शकता. चला तर मग या मर्यादित कालावधीच्या ऑफरमध्ये तुम्हाला कोणते फायदे मिळणार आहेत याबाबत जाणून घेऊया...
दरम्यान, रेनॉल्टचा हा खास इव्हेंट संपूर्ण भारतात आयोजित केला जात आहे, ज्यामध्ये शोरुममध्ये थीम असलेली कार्निव्हल, फॅमिली फ्रेंडली एक्टिविटीज आणि पहिल्यांदाच कार खरेदी करणाऱ्यांसाठी खास अनुभव यांचा समावेश आहे. याचा अर्थ असा की, आता कार खरेदी करणे हे केवळ एक काम राहणार नाही, तर एक यादगार अनुभव देखील असेल.
ही ऑफर रेनॉल्टच्या लोकप्रिय कार जसे की, RXT, RXT+ आणि RXZ व्हेरिएंटवर उपलब्ध आहे. यामध्ये 40,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस, 0 टक्के व्याजदराचा लोन ऑप्शन (NRFSI फायनान्सिंगवर) मिळेल. याशिवाय, प्रक्रिया शुल्कावर 50 टक्क्यांपर्यंत सूट, जुन्या ग्राहकांना लॉयल्टी बोनस आणि रेनॉल्ट ते रेनॉल्ट अपग्रेड करणाऱ्यांसाठी वेगळे फायदे मिळतील. याचा अर्थ असा की, जर तुमच्याकडे रेनॉल्ट कार असेल तर तुम्हाला अधिक फायदे मिळतील.
रेनॉल्ट आता त्यांच्या वाहनांमध्ये रेट्रोफिट सीएनजी किटचा ऑप्शन देखील देत आहे. ज्यामुळे ते पर्यावरणपूरक आणि स्वस्त बनतात. जर तुम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त असाल, तर सीएनजी हा एक ऑप्शन ठरु शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.