चीनी तंत्रज्ञान कंपनी टेनसेंट (Tencent) ने फ्लिपकार्टच्या (Flipkart) सह-संस्थापक बिन्नी बन्सल यांच्याकडून या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये भागभांडवल खरेदी केले आहे. Tencent च्या युरोपियन सब्सिडियरीसोबत हा करार 264 दशलक्ष डॉलर (सुमारे 2060 कोटी रुपये) मध्ये झाला आहे. अधिकृत कागदपत्रांमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. (Flipkart Tencent Deal)
बिन्नी बन्सल यांची हिस्सेदारी सुमारे 1.84 टक्क्यांवर आली
फ्लिपकार्टचे मुख्यालय सिंगापूरमध्ये आहे आणि त्याचे कामकाज फक्त भारतापुरते मर्यादित आहे. Tencent Cloud Europe BV सोबत करार केल्यानंतर Flipkart मधील बिन्नी बन्सलची हिस्सेदारी जवळपास 1.84 टक्क्यांवर आली आहे.
Tencent चा Flipkart मधील 0.72 टक्के हिस्सा
हा करार 26 ऑक्टोबर 2021 रोजी पूर्ण झाला आणि चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सरकारी अधिकार्यांना याची माहिती देण्यात आली. आता Tencent च्या सब्सिडियरीची Flipkart मधील भागीदारी 0.72 टक्क्यांपर्यंत वाढली आहे, जे सुमारे 264 दशलक्ष डॉलर आहे. जुलै 2021 पर्यंत, या ई-कॉमर्स कंपनीचे मूल्य 37.6 अब्ज डॉलर होते.
सिंगापूरमध्ये फ्लिपकार्ट टेनसेंट करार
बन्सल आणि टेनसेंट यांच्यातील करार जुलैमध्ये वित्तपुरवठ्या नंतर झाला होता. त्या वित्तपुरवठा फेरीत 3.6 अब्ज डॉलर उभारल्यानंतर, फ्लिपकार्टचे मूल्य 37.6 अब्ज झाले होते. हा करार सिंगापूरमध्ये झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, फ्लिपकार्टने भारतीय अधिकाऱ्यांना सांगितले आहे की ती एक जबाबदार कंपनी आहे आणि हा करार 'प्रेस नोट 3' च्या कक्षेत येत नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.