Personal Loan: देशातील या बड्या बँका बिनदिक्कतपणे देतायेत कर्ज! या कागदपत्रांची करा पूर्तता

SBI Personal Loan Document: आपत्कालीन परिस्थितीत पगारदार लोकांसाठी पर्सनल लोन हा सर्वात मोठा आधार असतो.
Personal Loan
Personal Loan Dainik Gomantak
Published on
Updated on

Bank Loan Required Document Immediately: आपत्कालीन परिस्थितीत पगारदार लोकांसाठी पर्सनल लोन हा सर्वात मोठा आधार असतो. परंतु आजकाल ऑनलाइन अ‍ॅप्स अगदी सहजपणे झटपट कर्ज देत आहेत, जरी या अ‍ॅप्सद्वारे कर्ज घेणे आपल्यासाठी धोकादायक असू शकते. कारण यामध्ये अधिक व्याज आकारले जाते, याशिवाय विविध प्रकारचे शुल्कही वसूल केले जाते.

दरम्यान, ही कर्जे वेळेवर न भरल्यास विलंब शुल्काच्या नावाखाली मोठी रक्कम वसूल केली जाते. त्यामुळे तुम्ही देशातील मोठ्या बँकांमध्ये पर्सनल लोनसाठी अर्ज केल्यास अधिक फायद्याचे होईल. जिथे तुम्हाला कमी व्याजावर कर्ज दिले जाते. चला तर मग जाणून घेऊया... SBI, ICICI आणि HDFC सारख्या मोठ्या बँकांमध्ये (Banks) कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत.

Personal Loan
Ayushman Bharat Yojana: मोफत उपचारांसाठी बनवा आयुष्मान कार्ड बनवा! वाचा कसा करावा अर्ज

क्रेडिट स्कोअर खूप महत्त्वाचा

क्रेडिट स्कोअरद्वारे बँका ग्राहकाची कर्ज परतफेड करण्याची क्षमता तपासतात. बँका नेहमी फक्त चांगले CIBIL स्कोर असलेल्यांनाच कर्ज देतात. जर एखाद्याचा क्रेडिट स्कोर 750 पेक्षा जास्त असेल तर तो चांगला मानला जातो. तुमचा कर्जाचा इतिहास CIBIL स्कोअरने ओळखला जातो. याच्या मदतीने बँकांना तुमच्या कर्जाचा दृष्टिकोन, तुम्ही कर्जाची परतफेड कशी करता हे समजते. याशिवाय अर्जदाराला नोकरीचे तपशील, अ‍ॅड्रेस प्रूफ, आधार कार्ड, पॅन कार्ड (PAN Card), बँक स्टेटमेंट इत्यादी कागदपत्रे बँकेत द्यावी लागतात.

State Bank of India

1. जर तुम्हाला देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI कडून कर्ज घ्यायचे असेल तर तुमचे मासिक उत्पन्न किमान 15 हजार रुपये असावे.

2. याशिवाय, तुमची EMI भरण्याची क्षमता आणि तुमचे निव्वळ मासिक उत्पन्न 50% पेक्षा कमी असावे. तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा कोणत्याही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये असाल किंवा निवडक कॉर्पोरेट कंपनीत असाल तर तुम्हाला पर्सनल लोन सहज मिळेल.

Personal Loan
Ayushman Bharat Golden Card: ओमिक्रॉनवर होईल मोफत उपचार, वाचा सविस्तर

ICICI Bank

1. ज्यांचे वय 23 ते 58 वर्षांच्या दरम्यान आहे आणि त्यांचे मासिक उत्पन्न 30 हजार किंवा त्याहून अधिक आहे.

2. ही बँक किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभवही मागते.

3. याशिवाय, तुम्ही ज्या ठिकाणी रहात आहात त्या ठिकाणी तुम्ही किमान एक वर्ष वास्तव्य केले असावे.

Personal Loan
आपल्या नावाने दुसऱ्याला आयुष्मान भारत कार्ड जारी झाले तर...

HDFC Bank

1. ज्यांचे वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान आहे आणि जे खाजगी कंपनी, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये किंवा सरकारी कर्मचारी आहेत, ते कर्जासाठी अर्ज करु शकतात.

2. ही बँक अशा लोकांना कर्ज देण्यास प्राधान्य देते, जे किमान दोन वर्षे काम करत आहेत आणि त्यांना त्यांच्या सध्याच्या नोकरीत किमान एक वर्ष पूर्ण झाले आहे, त्यांचे मासिक वेतन किमान 25 हजार रुपये आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com