चारधाम यात्रेवर पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींचे संकट

महागाईचा फटका आता चारधाम यात्रेवरही बसणार आहे.
petrol and diesel price hike
petrol and diesel price hikeDainik Gomantak
Published on
Updated on

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सतत वाढ होत आहे. यामुळे आता याचा परिणाम चारधाम यात्रेवरी होणार आहे. टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकांनी भाडे दुपटीहून अधिक वाढवले ​​आहेत. तर इतर वाहनांच्या भाड्यात 30 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे

पाचपुरी टेम्पो ट्रॅव्हलर्स असोसिएशनचे सचिव जगलाल गुप्ता यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सतत वाढ होत आहे. त्यामुळे चारधाम यात्रा महागात पडणार आहे. अशा परिस्थितिमध्ये चारधामला जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरचे दरही वाढवण्यात आले आहेत. मागील वर्षी टेम्पोने 4000 रुपय आकारले होते तर यंदा 8500 एवढा दर आकरण्यात येणार आहे. चारधामसाठी बहुतेक टेम्पो बाहेरून येणाऱ्या प्रवाशांनी आधीच बुक केले आहेत.

petrol and diesel price hike
तुम्ही तुमचा UAN पासवर्ड विसरलाय? घाबरू नका, असा करा नवीन पासवर्ड रीसेट

ट्रॅव्हल असोसिएशन हरिद्वारचे अध्यक्ष उमेश पालीवाल यांनी सांगितले की, 2020 मध्ये चारधाम यात्रा कोरोना संकटामुळे बंद झाली होती. पण 2021 मध्ये चारधाम यात्रा कोरोंनाच्या निर्बंधावर चालवली गेली. यावेळी चारधाम यात्रेला मोठ्या संख्येने भाविक मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने अन्य वाहनांचे चारधाम यात्रेचे दरही वाढवण्यात आले आहेत. हरिद्वारपासून चारधामसाठी इनोव्हा 4500 वरून 6000, बोलेरो आणि मॅक्स 3500 वरून 5000, डिझायर 2800 ते 3800 रुपये प्रतिदिन करण्यात आली आहे.

* बस भाड्यात 50 हजारांची वाढ

चारधाम यात्रेला जाण्यासाठी यंदा 1.60 लाख रुपयांमध्ये 42 आसनी बस 10 दिवसांसाठी बुक केली जाऊ शकते. तर 2021 मध्ये ते 1.10 लाख रुपयांना बुक करण्यात आले होते. त्याचप्रमाणे बस 3x2 शेअरमधील प्रति सीट तिकीट चारधामसाठी 4000 रुपयांना बुक केले जाईल. 2021 मध्ये हेच भाडे 3000 रुपये निश्चित करण्यात आले होते.

* चार धामसाठी तीन पॅकेजेस तयार

हरिद्वार ट्रॅव्हल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सुमित श्रीकुंज यांनी माहिती दिली की, चारधाम यात्रा एकूण 9 दिवसांची असते. दोन धामसाठी 5 दिवसांचे, एका धामसाठी 3 दिवसांचे पॅकेज ठेवण्यात आले आहे. प्रत्येक पॅकेजमध्ये अतिरिक्त दिवस ठेवून आधीच पैसे घेतले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com