Modi Govt: सरकार आता या बँकेतील स्टेक विकणार, कमावणार 4 हजार कोटी !

Axis Bank Stocks: सरकार खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेतून बाहेर पडणार आहे.
Finance Minister Nirmala Sitharaman
Finance Minister Nirmala SitharamanDainik Gomantak

Axis Bank Stocks: सरकार खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेतून बाहेर पडणार आहे. बँकेतील 1.55 टक्के हिस्सा म्हणजेच 4.65 कोटी शेअर्स विकण्याची सरकारची योजना आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (SUUTI) च्या स्पेसिफाइड अंडरटेकिंगची अ‍ॅक्सिस बँकेतील 1.55 टक्के हिस्सेदारी विकण्याची योजना आहे. या विक्रीमुळे सरकार अ‍ॅक्सिस बँकेतील आपली संपूर्ण हिस्सेदारी काढून घेईल.

दरम्यान, SUUTI कडे सप्टेंबर 2022 पर्यंत 4,65,34,903 शेअर्स असून अ‍ॅक्सिस बँकेत 1.55 टक्के स्टेक होता. सध्याच्या बाजारभावानुसार शेअर विक्रीतून सरकारला सुमारे 4,000 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. अ‍ॅक्सिस बँकेचा (Axis Bank) शेअर बुधवारी बीएसईवरील मागील बंदच्या तुलनेत 0.17 टक्क्यांनी वाढून 874.35 रुपयांवर बंद झाला.

Finance Minister Nirmala Sitharaman
Axis Bank MCLR Hike: Axis Bank चा ग्राहकांना जोर का झटका! बँकेने बदलला हा नियम

तसेच, गेल्या वर्षी मे महिन्यात सरकारने (Government) अ‍ॅक्सिस बँकेतील 1.95 टक्के हिस्सा SUUTI मार्फत सुमारे 4,000 कोटी रुपयांना विकला. ''10 नोव्हेंबर रोजी ऑफरच्या पहिल्या दिवशी, केवळ गुंतवणूकदारांना बोली लावण्याची परवानगी असेल," असे एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे. तर 11 नोव्हेंबर रोजी फक्त बिगर किरकोळ गुंतवणूकदारांनाच बोली सादर करण्याची परवानगी असेल. SEBI अंतर्गत नोंदणीकृत म्युच्युअल फंड आणि IRDAI अंतर्गत विमा कंपन्यांना OFS च्या 25% पेक्षा जास्त वाटप केले जाईल.

दुसरीकडे, ICICI सिक्युरिटीज, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया आणि मॉर्गन स्टॅनले इंडिया विक्रेत्याच्या वतीने ब्रोकर म्हणून काम करतील. एका आठवड्यापूर्वी, यूएस प्रायव्हेट इक्विटी प्रमुख बेन कॅपिटलने खुल्या बाजारातील व्यवहाराद्वारे अ‍ॅक्सिस बँकेतील 0.54 टक्के हिस्सा 1,487 कोटी रुपयांना विकला.

Finance Minister Nirmala Sitharaman
Axis Bankच्या शेअर्समध्ये 163 पटीने वाढ

शिवाय, अ‍ॅक्सिस बँकेने सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत चांगली कामगिरी केली होती. त्यांचा निव्वळ नफा 70 टक्क्यांनी वाढून 5,330 कोटी रुपये झाला होता. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 31 टक्क्यांनी वाढून रु. 10,360.3 कोटी झाले तर निव्वळ व्याज मार्जिन 3.96 टक्के आहे, जे वर्षभरात 57 बेस पॉइंट्सने वाढले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com