यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांची होळी मात्र मोठ्या थाटात साजरी करण्यात येणार आहे. केंद्र सरकार विशेष उत्सव योजना देण्याची घोषणा करू शकते. अॅडव्हान्स योजनेंतर्गत केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना 10,000 रुपयांची तरतूद करू शकते, म्हणजेच केंद्राचे कर्मचारी होळीच्या सणांना 10,000 रुपये अॅडव्हान्स घेऊ शकतात आणि त्यावरती कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही आणि त्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 असू शकते. गेल्या वर्षीही केंद्र सरकारने (Central Government) केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही घोषणा केली होती. (7th Pay Commission Festival Advance Scheme)
सणांसाठी दिलेली ही आगाऊ रक्कम प्री लोडेड असणार आहे. हे पैसे आधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एटीएममध्ये नोंदवले जातील, त्यांना फक्त खर्च करावे लागणार आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिले जाणारे 10,000 रुपयांचे हे अॅडव्हान्स पूर्णपणे व्याजमुक्त असणार आहे आणि त्याच्या परतफेडीसाठी कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही. तसेच, या रकमेचा परतावा देखील 10 हप्त्यांमध्ये केला जाणार आहे. हे फक्त 1,000 रुपयांच्या मासिक हप्त्यांमध्ये भरता येणार आहे.
फेस्टिव्हल अॅडव्हान्स स्कीम अंतर्गत सुमारे 4000-5000 कोटी रुपयांचे वाटप सरकारकडून जाहीर केले जाऊ शकते. राज्य सरकारनेही (State Government) ही योजना अंमलात आणली तर सुमारे 8,000-10,000 कोटी रुपये खर्च होतील, असे सांगण्यात आले आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, सरकार योजनेचे बँक शुल्क देखील घेणार आहे. कर्मचारी देखील ही आगाऊ रक्कम डिजिटल पद्धतीने खर्च करू शकणार आहेत.
यापूर्वीही, सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा रजा प्रवास भत्ता (LTA) दोन वर्षांसाठी वाढवला होता. यासोबतच केंद्रीय कर्मचारी मार्च 2022 पर्यंत ईशान्य, लडाख, अंदमान-निकोबार आणि जम्मू-काश्मीरच्या प्रवासासाठी रजा प्रवास भत्ता (LTA) वापरू शकतील.
केंद्रातील कर्मचाऱ्यांना दर 3 वर्षांनी रजा प्रवास भत्ता दिला जातो. यामध्ये कर्मचारी कुठेही गेल्यास प्रवास भत्ता मिळू शकतो. यामध्ये कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबतील सदस्य एकत्र फिरायला जाऊ शकतात. प्रवासात होणारे अनेक खर्च एलटीएच्या रकमेतून दिले जातात.
यापूर्वी, सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रवास भत्ता रजा योजनेत कॅश व्हाउचर योजना (LTC Cash Voucher Scheme) जाहीर केले होते. या योजनेंतर्गत, प्रवासी भत्त्याच्या बदल्यात कर्मचाऱ्यांना मिळणारी रोख रक्कम बाजारात सर्कुलेट केली जाते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.