

FASTag Latest News: तुम्हीही हायवेवर गाडी चालवत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. महामार्गावरुन प्रवास करण्यांसाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत.
आता सरकारकडून अशी सुविधा सुरु केली जात आहे, ज्यामध्ये तुम्हाला फास्टॅगची गरजही भासणार नाही. नॉन-स्टॉप पेमेंट आणि राष्ट्रीय महामार्गांवर वाहनांची वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी सरकारकडून अनेक सुविधा पुरविल्या जातात.
वाहनांच्या सुविधा लक्षात घेऊन आणि गर्दीच्या लांबच लांब रांगा दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडून अनेक निर्णय घेतले जात आहेत.
सरकारने सांगितले की, लवकरच तुम्हाला फास्टॅगच्या जागी जीपीएस आधारित टोल सिस्टीमची सुविधा मिळेल, त्यानंतर टोल प्लाझाची भूमिका आणि त्यावरील अवलंबित्व पूर्णपणे संपेल.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून (MoRTH) मिळालेल्या माहितीनुसार, सरकार (Government) सध्या महत्त्वाकांक्षी योजनांच्या आधारे नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे, त्यानंतर मोटार वाहन कायदा आणि टोल सुलभ करण्यासाठी सुधारणांवर काम केले जाईल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जीपीएस आधारित प्रणाली सुरु करताना बरीच सोय होणार आहे, परंतु त्याआधी सरकारला या तंत्रज्ञानासाठी तयार राहावे लागेल. तांत्रिक पायाभूत सुविधांबरोबरच रस्त्यांच्या सुधारणांचे कामही करावे लागणार आहे.
यासोबतच, मोटार वाहन कायद्यातही सुधारणा करावी लागणार आहे. टोल प्लाझाची गरज संपुष्टात आणण्यासाठी तुम्हाला जीपीएस आधारित टोलिंग प्रणालीसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.