

DA Hike Cabinet Meeting Updates Today: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आजचा (21 ऑक्टोबर) दिवस अत्यंत आनंदाचा आणि महत्त्वाचा ठरु शकतो. 1 जुलैपासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्यातील वाढीची प्रतीक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नजरा आज पार पडणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लागल्या आहेत. गेल्या काही आठवड्यात डीएची घोषणा लांबल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली, ज्यामुळे काही ठिकाणी निदर्शनेही झाली.
आजच्या या बैठकीत सरकार डीए वाढीची घोषणा करु शकते, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. ऑल इंडिया न्यू पेन्शन स्कीम आणि डिफेन्स एम्प्लॉइज फेडरेशनच्या मते, सणासुदीच्या काळात सरकार कर्मचाऱ्यांना ही मोठी भेट देऊ शकते.
यापूर्वी 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत रेल्वे व इतर कर्मचाऱ्यांसाठी बोनस घोषित करण्यात आला होता, मात्र डीएवर निर्णय झाला नव्हता. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी (Employees) 16 ऑक्टोबर रोजी आपला रोष व्यक्त करत लवकर डीए व डीआर जारी करण्याची मागणी केली होती. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 60 टक्के दराने महागाई भत्ता मिळत असून, मागील 12 महिन्यांच्या किरकोळ महागाईच्या आकडेवारीनुसार या वेळी डीए 3 टक्क्यांनी वाढून 63 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. उदाहरणार्थ, लेव्हल-7 मधील ज्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 44,900 रुपये आहे, त्याला 60 टक्के डीएनुसार 71,840 रुपये मिळतात.
जर डीए 63 टक्के झाला, तर हा पगार 73,187 रुपयांवर जाईल, ज्यामुळे दरमहा थेट 1,347 रुपयांचा फायदा होईल. मात्र, हे केवळ अंदाजित गणित असून अधिकृत आकडा सरकारी घोषणेनंतरच स्पष्ट होईल. वर्षभरात जानेवारी आणि जुलै अशा दोन वेळा डीए सुधारित केला जातो आणि दिवाळी जवळ आल्याने आजच्या बैठकीत सकारात्मक निर्णय होण्याबद्दल सर्वत्र तीव्र उत्सुकता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.