केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने गुरुवारी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालकांसह सहा वरिष्ठ अधिकार्यांना टाटा प्रोजेक्ट्सशी संबंधित लाचखोरी प्रकरणात अटक केली आहे, अशी बातमी पीटीआयने अधिकार्यांच्या हवाल्याने दिली. (Tata projects bribery case)
यापैकी टाटा प्रकल्पाचे (TATA Projects) कार्यकारी व्हीपी देशराज पाठक (Deshraj Pathak) आणि सहाय्यक व्हीपी आरएन सिंग (R.N.Singh) यांच्यासह पाच अधिकाऱ्यांनाही लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आली, असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
माध्यमांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अधिकाऱ्यांनी इटानगरमध्ये मर्जी वाढवण्यासाठी एका कंत्राटदाराकडून लाच मागण्यात आली होती.
एकूण 6 ठिकाणी झडतीदरम्यान, सीबीआयने गुरुग्रामच्या निवासस्थानातून 93 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. तर दिल्ली, गुरुग्राम, नोएडा आणि गाझियाबादमध्ये 11 ठिकाणी शोध सुरु आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.