भारतीय रेल्वे हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. म्हणूनच रेल्वे ही भारताची जीवनवाहिनी मानली जाते. अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने अनेक नियम केले आहेत. यामुळे त्यांना आनंददायी आणि सुरक्षित प्रवास करण्यास मदत होते. असे असले तरी ट्रेनमध्ये काही वस्तू घेऊन जाणे पूर्णपणे प्रतिबंधित आहे. या गोष्टींसह प्रवास केल्यास आपल्याला दंडही होऊ शकतो आणि तुरुंगवासही होऊ शकतो. (Carrying flammable things on a train journey can lead to jail)
रेल्वेचा प्रवाशांना इशारा :
पश्चिम रेल्वेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून प्रवाशांना कळवले आहे की, कोणत्याही प्रकारची ज्वलनशील वस्तू म्हणजेच ज्या वस्तूमुळे ट्रेनमध्ये आग लागू शकते अशा वस्तू सोबत घेण्यास पूर्णपणे बंदी आहे. हा नियम मोडल्यास रेल्वे प्रवाशांना दंड आकरण्यात येऊ शकतो. यासोबतच तुरुंगवास किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. रेल्वेच्या ट्विटमध्ये, रॉकेल, पेट्रोल, फटाके आणि गॅस सिलिंडर इत्यादी ज्वलनशील पदार्थ स्वतःहून नेऊ नये किंवा ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान कोणालाही ज्वलनशील पदार्थ घेऊन जाऊ देणे हा सुद्धा गुन्हा आहे.
होऊ शकते ही कारवाई-
फक्त रेल्वेमध्येच नाही तर रेल्वे परिसरात कोणत्याही प्रकारचे ज्वलनशील पदार्थ आणण्यास सक्त मनाई आहे. ट्रेनमध्ये कोणत्याही प्रकारचा ज्वलनशील पदार्थ वाहून नेल्यास, रेल्वे तुमच्यावर रेल्वे कायदा, 1989 च्या कलम 164 अंतर्गत कारवाई करू शकते. असे करताना पकडले गेल्यास, प्रवाशाला 3 वर्षांपर्यंत कारावास किंवा 1,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
रेल्वेच्या आवारात या गोष्टींवर बंदी-
सुके गवत, गॅस सिलिंडर, फटाके, पेट्रोल, रॉकेल, माचिस, रॉकेल आदी साहित्य रेल्वेत नेण्यास मनाई आहे. यासोबतच ट्रेनमध्ये धुम्रपान करण्यासही मनाई आहे. असे करताना पकडले गेल्यास तुम्हाला ३ वर्षांचा तुरुंगवास आणि दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.