Mahindra Thar: 17 लाख खर्च करण्याऐवजी सेकंड हँड Thar घ्या, पण डील फायनल करण्यापूर्वी...

नवीन थारची (Mahindra thar) वाट पाहण्याऐवजी आणि भरपूर पैसे खर्च करण्याऐवजी तुम्ही वापरलेली थार कार खरेदी करू शकता.
Mahindra thar
Mahindra tharDainik Gomantak
Published on
Updated on

Mahindra Thar 2020: थार ही महिंद्राची आवडती SUV कार आहे. नवीन महिंद्रा थार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना प्रतीक्षा कालावधी देखील मिळत आहे. तुम्हालाही थार आवडत असेल आणि खरेदी करायची असेल तर त्यासाठी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो. नवीन थारची वाट पाहण्याऐवजी आणि भरपूर पैसे खर्च करण्याऐवजी तुम्ही वापरलेली थार कार खरेदी करू शकता. हे करण्यापूर्वी तुम्हाला पाच गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या पाच खास गोष्टी. (Mahindra Thar Price)

1. अंडर बॉडी डैमेज

थार ही ऑफ-रोडिंगसाठी बनवलेली कार देखील आहे. बरेच लोक थार सह जोरदार ऑफ-रोडिंग करतात. ऑफ-रोडिंग दरम्यान अनेक वेळा कारला अंडर-बॉडी डॅमेजला सामोरे जावे लागते, त्यामुळे जुनी कार घेण्यापूर्वी तिचा रॅम्प नक्कीच तपासा. त्यावर कोणतेही डेंट किंवा मोठे नुकसान झाले लसल्याची खात्री करा. गाडीला कुठल्या मोठ्या दगडाने दुखापत तर झाली नाही ना? हे तपासून पाहा.

Mahindra thar
Citroen C3 भारतात 5.71 लाख रुपयांना लॉन्च, देशातील फ्रेंच उत्पादकाची दुसरी कार

2. रूफ लीकेज

थार तीन रूफ ऑप्शनमध्ये येते. थारच्या छतावरून अनेक ठिकाणी पाणी शिरल्याचे समोर आले आहे. या प्रकाराचा प्रश्न अनेक ग्राहकांसमोर आला आहे. तेव्हा जुनी थार खरेदी करण्यापूर्वी छताला गळती तर नाही ना हे लक्षात ठेवा.

3. एंड्रॉयड ऑटो कनेक्ट

ज्या ग्राहकांनी थारचा वापर केला आहे त्यांनी त्याच्या Android Auto Connect बद्दल तक्रारी केल्या आहेत. ग्राहकांच्या तक्रारी आहेत की त्यांची यंत्रणा अचानक फोनवरून खंडित झाली आहे. त्यामुळे वापरलेली कार घेण्यापूर्वी तिची म्युझिक सिस्टीम नीट काम करत आहे की नाही हे तपासले पाहिजे.

4. खराब कैमशाफ्ट

महिंद्राने 7 सप्टेंबर 2020 ते डिसेंबर 2020 दरम्यान 1577 थार कार परत मागवल्या होत्या. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या गाड्यांच्या कॅमशाफ्टमध्ये बिघाड होता. या काळात खरेदी केलेली डिझेल थार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टीची विशेष काळजी घ्या.

Mahindra thar
RBI Governor: इतर देशांच्या तुलनेत भारतीय रुपया चांगल्या स्थितीत- शक्तिकांत दास

5. किंमत काय आहे?

नवीन थारच्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 13.53 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ती 16.02 लाख रुपयांपर्यंत जाते. थारची मागणी जास्त असल्याने सेकंड हँड कारही चढ्या भावाने विकल्या जातात. म्हणून कार तज्ञांनी असा सल्ला दिला आहे की कार चांगल्या स्थितीत आणि उत्पादन वर्ष असल्यास वापरलेल्या कारसाठी 9 ते 15 लाख रुपये दिले जाऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com