Union Budget 2022: 5 जी स्पेक्ट्रमचाही होणार लिलाव - अर्थमंत्री

देशातील खेड्यातील लोक 5 जी सेवांच्या डिजिटल माध्यमांचा वापर करू शकतील, ही सरकारची दृष्टी आहे. यासाठी एक राष्ट्र - एक नोंदणी धोरण लागू केले जाईल.
5G Telecom
5G TelecomDainik Gomantak
Published on
Updated on

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज जाहीर केले की खाजगी दूरसंचार पुढील वर्षी 5G सेवा सुरू करणार आहेत. "सर्वसाधारणपणे दूरसंचार आणि 5G तंत्रज्ञानामध्ये विशेषत: नोकरीच्या संधी निर्माण होतील," केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना नमूद करतांना अर्थमंत्र्यांनी सांगितले की 2022-23 मध्ये 5G मोबाइल सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक स्पेक्ट्रम लिलाव हे 2022 मध्येच केले जातील. 5G Telecom)

5G Telecom
Union Budget 2022 Highlights: सलग सहाव्या वर्षी करात कोणतीही सवलत नाही

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman)यांनी आज देशाचा अर्थसंकल्प(Budget) सादर केला. यावेळी त्यांनी दृष्टीनं काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. 2022- 23 या वर्षांमध्ये चिप असलेले पासपोर्ट दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाय 2022 मध्येच 5 जी स्पेक्ट्रमचाही लिलाव करण्यात येणार असल्याचं सुध्दा त्या म्हणाल्या.

गावातील लोकांपर्यंत इंटरनेटची सेवा पोहोचण्यासाठी 5 जी सेवांच्या लाँचसाठी एक नवीन स्कीम आणली जाणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले. देशाच्या ग्रामीण आणि दुर्गम भागांसाठी बँक आणि मोबाईल आधारित सुविधांसाठी सेवा वाटप निधी प्रदान केला जाईल. देशातील खेड्यातील लोक 5 जी सेवांच्या डिजिटल माध्यमांचा वापर करू शकतील, ही सरकारची दृष्टी आहे. यासाठी एक राष्ट्र - एक नोंदणी धोरण लागू केले जाईल. खेड्यापाड्यात ब्रॉडबँड सेवेला मोठ्या प्रमाणात चालना दिली जाईल, असेही अर्थमंत्र्यांनी यावेळी घोषीत केलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com