BSNL New Offer: आपण वापरत असलेल्या मोबाईल नेटवर्कच्या नवीन प्लॅन आणि ऑफर्सबद्दल आपल्याला नेहमीच आकर्षण असते. खाजगी मोबाईल नेटवर्क कंपन्यांमध्ये नेहमीच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चढाओढ दिसून येते. यासाठी ते नेहमी नवनवीन प्रीपेड प्लॅन बाजारात आणत असतात. या सगळ्यामध्ये देशातील सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडही (BSNL) यात मागे नाही. (BSNLs most reasonable plan for 365 days)
खासगी मोबाईल कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी BSNLने 365 दिवसांची योजना सादर केली आहे. प्रीपेड यूजर्स बीएसएनएलचा हा प्लॅन फक्त 797 रुपयांना खरेदी करू शकतात. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये इंटरनेट, एसएमएस आणि कॉलिंगची सुविधा 365 दिवसांसाठी मिळणार आहे.
BSNLच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 60 दिवसांसाठी दररोज 2 जिबी, दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळणार आहे. 2 जिबी डेटा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 80 kbps होईल. शिवाय तुम्हाला 365 दिवसांसाठी इनकमिंग कॉलची सुविधा असेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.