BSNL-BBNL Merger : BSNL बाबत मोठी घोषणा! कंपनीच्या विलीनीकरणाला पंतप्रधानांनी दिली मंजुरी

BSNL-BBNL Merger : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या पुनरुज्जीवनासाठी 1.64 लाख कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन पॅकेजला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
BSNL-BBNL Merger
BSNL-BBNL MergerDainik Gomantak
Published on
Updated on

BSNL च्या विलीनीकरणाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएसएनएलच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स (CCEA) बाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

वास्तविक, पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या पुनरुज्जीवनासाठी 1.64 लाख कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन पॅकेजला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. म्हणजेच आता लवकरच बीएसएनएलचे विलीनीकरण होणार आहे.

(BSNL-BBNL Merger)

BSNL-BBNL Merger
Indian Railways: रेल्वेने दिली आनंदाची बातमी, दिवाळीसाठी सुरु केली ही सुविधा

केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, 'बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारने 1,64,156 कोटी रुपयांचे पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले आहे. याशिवाय, मंत्रिमंडळाने भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड (BBNL) यांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली. BSLN BBNL मध्ये विलीन झाल्यावर ग्राहकांना देखील फायदा होईल.

तुम्हाला कोणता फायदा होईल?

हे लक्षात घेण्यासारखे आहे की या विलीनीकरणामुळे, BSNL कडे आता देशभरात पसरलेल्या BBNL च्या 5.67 लाख किमी ऑप्टिकल फायबरचे संपूर्ण नियंत्रण असेल. यासाठी सरकार येत्या तीन वर्षांत बीएसएनएलसाठी 23,000 कोटी रुपयांचे रोखे जारी करणार आहे.

वेळी, सरकार एमटीएनएलसाठी 2 वर्षांत 17,500 कोटी रुपयांचे रोखे जारी करेल. ते पुढे म्हणाले, 'बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारने 1,64,156 कोटी रुपयांचे पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले आहे. यामुळे टेलिकॉम कंपनीला 4G वर अपग्रेड होण्यास मदत होणार आहे.

सरकारची तयारी काय?

या विलीनीकरणाबाबत सरकारने विशेष नियोजन केले आहे. BSNL चे 6.80 लाख किमी पेक्षा जास्त ऑप्टिकल फायबर नेटवर्क आहे. त्याच वेळी, BBNL ने देशातील 1.85 लाख ग्रामपंचायतींमध्ये 5.67 लाख किलोमीटर ऑप्टिकल फायबर टाकले आहे. युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (USOF) द्वारे BBNL ने घातलेल्या फायबरचे नियंत्रण BSLN ला मिळेल.

अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, बीएसएनएलची 33,000 कोटी रुपयांची वैधानिक थकबाकी इक्विटीमध्ये रूपांतरित केली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com