वादाच्या भोवऱ्यात अडकली मलबार गोल्ड, करीनाच्या जाहिरातीवर बहिष्कार

करीना कपूरने हिंदूंच्या सणाच्या जाहिरातीमध्ये टिकली का लावला नाही?
boycott malabar gold twitter trend no bindi no business kareena kapoor akshaya tritiya ad
boycott malabar gold twitter trend no bindi no business kareena kapoor akshaya tritiya adDainik Gomantak
Published on
Updated on

अलीकडच्या काळात अनेक ब्रँड जाहिरातींबाबत सोशल मीडियावर लोकांच्या नाराजीला बळी पडत आहेत. ह्युंदाई आणि किया मोटर्स यांसारख्या ऑटो कंपन्यांना अलीकडेच सोशल मीडियावर बहिष्काराचा फटका बसला होता. टाटा समूहाची ज्वेलरी कंपनी तनिष्कही एका जाहिरातीवरून वादात सापडली आहे. आता मलबार गोल्ड हे यात एक नवीन नाव जोडले गेले आहे. नुकत्याच आलेल्या एका जाहिरातीमुळे लोक या ज्वेलरी ब्रँडवर नाराजी व्यक्त करत आहेत.

अक्षय्य तृतीयेसाठी मलबार सोन्याची जाहिरात

मलबार गोल्डने नुकतीच अक्षय्य तृतीया सणासंदर्भात एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आहे. अक्षय्य तृतीयेशी संबंधित या जाहिरातीत करीना एका टिकलीशिवाय दिसत आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सना ही गोष्ट आवडली नाही. लोकांचे म्हणणे आहे की अक्षय्य तृतीया हा हिंदूंचा पवित्र सण आहे आणि या निमित्ताने लोक दागिन्यांची खरेदी करतात. युजर्स प्रश्न उपस्थित करत आहेत की करीना कपूरने हिंदूंच्या सणाच्या जाहिरातीमध्ये टिकली का लावला नाही?

boycott malabar gold twitter trend no bindi no business kareena kapoor akshaya tritiya ad
कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना कधी आणि कुठे?

सोशल मीडियावर बहिष्कार ट्रेंडिंग

अनेक वापरकर्ते #Boycott_MalabarGold आणि #No_Bindi_No_Business या हॅशटॅगसह ट्विटरवर पोस्ट अपडेट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'मलबार गोल्डची नवी जाहिरात हिंदू सणांची खिल्ली उडवण्याचे नवे उदाहरण आहे. भारतीय महिलांच्या पारंपरिक पेहरावात टिकलीला महत्त्व आहे.

टिकली न लावल्याने यूजर्स दुखावले

'बॉयकॉट मलबार गोल्ड' आणि 'नो टिकली, नो बिझनेस' हे हॅशटॅग वापरून आणखी एका वापरकर्त्याने लिहिले की, 'ज्वेलर अक्षय तृतीयेसाठी जाहिरात प्रसिद्ध करत आहे आणि करीना कपूर बिंदीशिवाय आहे. ते हिंदू संस्कृतीचा आदर करतात का?' मलबार गोल्ड सारख्या ब्रँडने हे समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे अशा ब्रँडला बाहेचा रस्ता दाखवण्याची वेळ हिंदूंवर आली आहे.

ज्वेलरी कंपनी मलबार इतकी जुनी आहे

कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, मलबार गोल्डची स्थापना 1993 मध्ये एमपी अहमद यांच्या नेतृत्वाखालील उद्योजकांच्या टीमने केली होती. कंपनीचे मुख्यालय केरळच्या कोझिकोड शहरात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com