SBI ग्राहकांसाठी मोठी अपडेट! अनेक खाती फ्रीज, तुम्ही यामध्ये आहात का ते तपासा

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
SBI Freezes Accounts
SBI Freezes AccountsDainik Gomantak
Published on
Updated on

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI खाते) ग्राहकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. बँकेने अनेक खाती फ्रीज केली आहेत. म्हणजेच आता या खातेदारांना त्यांच्या खात्यातून कोणताही व्यवहार करता येणार नाहीये. बँकेने असे का केले, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तर उत्तर असे आहे की, या खातेदारांनी त्यांची केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाहीये. केवायसी करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते पहा. (SBI Freezes Accounts)

SBI Freezes Accounts
ट्रेनमध्ये प्रवासी आपल्यासोबत किती किलो मोफत सामान घेऊन जाऊ शकतात?

ग्राहकांची तक्रार काय?

स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक गौरव अग्रवाल ट्विटरवर लिहितात की, 'मी केवायसी न केल्यामुळे माझ्या खात्यावरील व्यवहार प्रक्रिया बॅंकेकडून थांबवण्यात आली. पण मला कोणीही केवायसी अपडेट करण्यास सांगितलेले नाहीये. यावर टिप्पणी करताना SBI ने लिहिले की, 'RBI च्या नियमांनुसार, ग्राहकांना वेळोवेळी KYC अपडेट करावे लागत असते.

अशा परिस्थितीत, ज्या ग्राहकाची KYC प्रक्रिया अपूर्ण होती त्यांना एसएमएससह इतर अनेक माध्यमातून याची माहिती देण्यात आली आहे. बँकेला पुढे सांगण्यात आले की, 'सूचनेनुसार, एकतर तुम्ही तुमच्या शाखेत जाऊन केवायसी प्रक्रिया करा किंवा तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवरून तुमच्या KYC दस्तऐवजाची प्रत शाखेच्या अधिकृत ई-मेल आयडीवर पाठवू शकता.

कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

पासपोर्ट

मतदार ओळखपत्र

ड्रायव्हिंग लायसन्स

आधार पत्र/कार्ड

मनरेगा कार्ड

पॅन कार्ड

ही प्रक्रिया कशी पूर्ण होईल?

एसबीआय ग्राहकांना त्यांची आवश्यक माहिती एका विशिष्ट स्वरूपात स्वाक्षरीसह बँकेला द्यावी लागणार आहे. ग्राहक पोस्ट किंवा ई-मेलद्वारेही ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात असेही बॅंकेने सांगितेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com