Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी, 31 मार्चपर्यंत 'हे' काम केले नाहीतर...

Mutual Fund Nomination: म्युच्युअल फंडाच्या विद्यमान गुंतवणूकदारांना नॉमिनी नॉमिनेशन करण्यासाठी किंवा हा पर्याय निवडू नये यासाठी 31 मार्चची अंतिम मुदत आहे.
Mutual Fund
Mutual Fund Dainik Gomantak

Mutual Fund Returns: म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. म्युच्युअल फंडाच्या विद्यमान गुंतवणूकदारांना नॉमिनी नॉमिनेशन करण्यासाठी किंवा हा ऑप्शन निवडू नये यासाठी 31 मार्चची अंतिम मुदत आहे.

जर नॉमिनेशन केले नाही तर गुंतवणूकदारांची खाती बंद केली जातील आणि त्यांना त्यांची गुंतवणूक काढता येणार नाही. जर ते नको, त्यांना फंड हाऊसेसला डिक्लेरेशन द्यावे लागेल की, त्यांच्याकडे कोणीही नॉमिनी नाही. ज्यामुळे ते नॉमिनेशनमध्ये हिस्सेदारी घेऊ शकणार नाही.

दरम्यान, रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने 15 जून 2022 रोजी एक परिपत्रक जारी केले होते, ज्यामुळे म्युच्युअल फंड ग्राहकांना (Customers) 1 ऑगस्ट 2022 रोजी किंवा नंतर नॉमिनीचे तपशील देणे किंवा हा ऑप्शन निवडणे बंधनकारक केले होते.

नंतर अंतिम तारीख बदलून ऑक्टोबर 2022 करण्यात आली. सर्व विद्यमान म्युच्युअल फंड खात्यांची (संयुक्त खात्यांसह) अंतिम तारीख 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे, त्यानंतर, तुम्ही खात्यातून पैसे काढू शकणार नाही.

Mutual Fund
Mutual Fund SIP: एसआयपीमध्ये गुंतवणूक करताय? मग लक्षात ठेवा 'या' गोष्टी...

दुसरीकडे, या निर्णयामागील सेबीचा हेतू स्पष्ट करताना आनंद राठी वेल्थ लिमिटेडचे ​​चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) निरंजन बाबू रामायणम म्हणाले की, भूतकाळातील अशी अनेक गुंतवणूक खाती असू शकतात, जी कोणालाही नॉमिनी न बनवता उघडली गेली असतील.

तसेच, सर्व म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमधील गुंतवणूकदारांसाठी (Investors) नॉमिनेशन अनिवार्य आहे. तुम्ही ऑफलाइन फिजिकल फॉर्मद्वारे नॉमिनेशनसाठी अर्ज केल्यास, तुम्हाला त्यावर स्वाक्षरी देखील करावी लागेल.

याशिवाय, तुम्ही ऑनलाइन नॉमिनेशनसाठी ई-साइनचा पर्याय निवडू शकता. संयुक्त खाते असलेल्यांनाही नॉमिनेशन करावे लागेल.

Mutual Fund
Mutual funds: तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर 'ही' बातमी वाचा

SIP चे फायदे काय आहेत

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, भविष्याकडे पाहता लोक वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. त्यांना एफडी, पीएफ किंवा इतर कोणत्याही योजनेच्या तुलनेत जास्त परतावा मिळतो.

लोक सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. काही लोकप्रिय SIP द्वारे लोकांना 12-14 टक्के परतावा मिळाल्यावरही असे घडले आहे. हे देखील लक्षात घेतले पाहिजे की, SIP मधील गुंतवणूक देखील धोकादायक असू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com