देशातील बिग बुल राकेश झुनझुनवाला(Rakesh JhunJhunwala ) येत्या चार वर्षांत 70 विमाने आपल्या नवीन विमान कंपनीमध्ये(Air Line Sector)) सामील करून घेण्याची योजना आखत आहेत. त्यांना आशा आहे की, भविष्यात अधिक लोक विमानाने प्रवास करतील.आणि त्यासाठीच राकेश झुनझुनवाला एका नवीन विमान कंपनीत गुंतवणूक करणार आहेत. (Big Bull will buy 70 aircraft for Akasa Air)
राकेश झुनझुनवाला हे एका नवीन विमान कंपनीत 35 मिलियन डॉलरची गुंतवणूक करून कंपनीचा 40 टक्के हिस्सा हा स्वतःकडे ठेवणार आहेत. आणि त्याबद्दल येत्या 15 दिवसांतच त्यांना भारतीय उड्डाण मंत्रालयांकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याची अपेक्षा आहे. असे त्यांनी ब्लूमबर्ग वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे.
प्रवाशांना कमी खर्चात सेवा देणाऱ्या या विमान कंपनीचे नाव अकासा एअर असेल तसेच या कंपनीत डेल्टा एअर लाईन सारख्या कंपनीचे अधिकारी कार्यरत असणार आहेत. आणि कंपनीचे विमान एका वेळी 180 प्रवासी घेऊन प्रवास करणार असल्याचेही राकेश झुनझुनवाला यांनी सांगितले आहे.
राकेश झुनझुनवाला यांचे हा निर्णय धाडसी पाऊल म्हणून पाहायले जात आहे. झुनझुनवाला यांना भारताचे वॉरन बफे म्हणून आणि मार्केटचे बिग बुल म्हणून ओळखले जाते सध्या अनेक विमान कंपन्या डबघाईला आल्या असतानाच ते हे गुंतवणूक करत आहेत. तरीही, जगातील सर्वात वेगाने वाढणार्या विमान उड्डाण बाजारपेठेबद्दल एक आकर्षण आहे आणि झुंझुनवाला कमी भाडे घेऊन नवीन वाहकासह उड्डाण करणा-यांना आनंद देण्याच्या संधीकडे पहात आहेत.
तसेच झुनझुनवाला यावेळी बोलताना म्हणाले, “एखाद्या कंपनीची संस्कृतीच जर काटकसरीची असेल तर तुम्ही नवीन सुरुवात करायला पाहिजे, मी मागणीच्या बाबतीत भारताच्या विमानचालन क्षेत्राबद्दल खूपच उत्साही आहे."
कोरोना महामारीच्या आधीच देशातील अनेक विमान कंपन्या ह्या लॉस मधेय आल्या किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेड एकेकाळी देशातील दुसर्या क्रमांकाचा देशांतर्गत वाहक होता, 2012 मध्ये ही कंपनी बंद झाली आणि जेट एअरवेज इंडिया लिमिटेडला नुकतीच पुन्हा उडण्यास मान्यता देण्यात आली होती.
जागतिकबाजारचा विचार करता हवाई प्रवासाला सध्या मोठा फटका बसला आहे, तर संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कमी झाल्याने भारताच्या विमान उड्डाण उद्योगाला उशीरा वसुलीचा धोका निर्माण झाला आहे. याचाच परिणाम विमान कंपन्यांना होत आहे.सिंगापूर एअरलाइन्स लिमिटेड आणि टाटा समूहाची संयुक्त मालकी असलेली विस्तारा विमान प्रदानास विलंब करण्यासाठी व पेमेंटच्या वेळापत्रकात बदल करण्यासाठी बोईंग को आणि एअरबस एसई यांच्याशी चर्चा करीत आहे.
कोविड व्यत्ययामुळे त्याचे उत्पन्न घसरल्याने भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने अपेक्षेपेक्षा जास्त व्यापक तोटा नोंदविला आहे. पण याबद्दल राकेश झुनझुनवाला काहीच चिंता करत नाहीत उलट ते म्हणाले की, या क्षेत्रातले जगातील सर्वोत्कृष्ट लोक मला पार्टनर म्हणून मिळाले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.