2 नवीन स्कूटर लाँच, फक्त 499 रुपयात बुकिंग जाणून घ्या डिटेल्स...

कंपनीचा दावा आहे की ही स्कूटी 115 किमी माइलेज देतेय
bgauss launches two new bg d15 electric scooters with 115 km range at rs 99999 know price features
bgauss launches two new bg d15 electric scooters with 115 km range at rs 99999 know price features Danik Gomantak
Published on
Updated on

BGAUSS ने आज तिसरी इलेक्ट्रिक स्कूटर, BG D15 लाँच केली. D15 ही प्रीमियम पण परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. BG D15 पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे, IP 67 रेट केलेले आहे, इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरीने सुसज्ज आहे. BG D15 दोन प्रकारात येत आहे D15i आणि D15 Pro. (bgauss launches two new bg d15 electric scooters with 115 km range at rs 99999 know price features)

कंपनीच्या मते, BG D15 मध्ये 3.2 kWh ली-आयन बॅटरी देण्यात आली आहे. स्पोर्ट्स मोडमध्ये ही फक्त 7 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास वेग घेवू शकते. BG D15 इको आणि स्पोर्ट या दोन राइड मोडसह सादर करण्यात आल्या आहेत. यात 16 इंची अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. लिथियम-आयन बॅटरी 5 तास 30 मिनिटांत 100% चार्ज होऊ शकते. कंपनीचा दावा आहे की D15 ची ARAI मायलेज 115 किमी आहे.

bgauss launches two new bg d15 electric scooters with 115 km range at rs 99999 know price features
IPL 2022 यजुवेंद्र चहलसाठी हा पंजाबी खेळाडू धोक्याची घंटा

वैशिष्ट्ये

BG D15 नवीनतम इंटेलिजेंट कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आली आहे. याला स्मार्टफोनही जोडला जाऊ शकतो. BG D15 मध्ये काढता येण्याजोग्या बॅटरी, इन-बिल्ट नेव्हिगेशन, डिजिटल स्पीडोमीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कीलेस स्टार्ट, मोबाइल चार्जिंगसाठी यूएसबी पोर्ट, कॉल आणि नोटिफिकेशन अलर्ट यासारख्या नवीनतम वैशिष्ट्यांसह सादर करणयात आली आहे. स्कूटर पूर्णपणे मोबाइल अॅपवर कार्य करत आहे.

किंमत

BGAUSS चे सध्या भारतात 100 शोरूम आहेत. ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवरून नवीनतम BG D15 BGAUSS इलेक्ट्रिक स्कूटर बुक करू शकतात. बुकिंग रक्कम फक्त 499 आहे जी परत करण्यायोग्य आहे. ई-स्कूटरची किंमत D15i साठी 99,999 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, तर डी15 प्रो ची किंमत 1,14,999 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com