Best Travel Cards: या क्रेडिट कार्डांवर मिळणार अनेक फायदे

तुमच्‍या ट्रॅव्हल बुकिंगवर बचत करण्‍यासाठी, तुम्ही ठराविक क्रेडिट कार्डची मदत घेऊ शकता.
Best Travel Cards There are many benefits to these credit cards
Best Travel Cards There are many benefits to these credit cardsDainik Gomantak
Published on
Updated on
Best Travel Cards There are many benefits to these credit cards
Best Travel Cards There are many benefits to these credit cardsDainik Gomantak

Best Travel Credit Cards: सुट्टीचा हंगाम सुरू होणार आहे आणि प्रत्येकजण या वेळेचा भरपूर आनंद घेण्याची तयारी करत आहे. तुमच्‍या ट्रॅव्हल बुकिंगवर बचत करण्‍यासाठी, तुम्ही ठराविक क्रेडिट कार्डची मदत घेऊ शकता. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी बाजारात ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड आले आहेत, ज्यामधून तुम्ही आपल्या आवडीचे कार्ड निवडू शकता.

Best Travel Cards There are many benefits to these credit cards
Best Travel Cards There are many benefits to these credit cardsDainik Gomantak

HDFC Regalia क्रेडिट कार्ड

HDFC Regalia क्रेडिट कार्डमध्ये 1 कोटी रुपयांपर्यंतचे एयर एक्सीडेंटल डेथ कवर उपलब्ध आहे. यामध्ये 15 लाख रुपयांपर्यंतच्या इमर्जन्सी ओव्हरसीज हॉस्पिटलायझेशनचा फायदा देखील आहे. 2% ची परदेशी चलन मार्कअप फी देखील आहे. यामध्ये विमानतळावरील लाउंज प्रवेशाचा मोफत लाभ देखील समाविष्ट आहे. यामध्ये भारतातील 12 आणि इतर सहा देशांमधील विमानतळावरील विश्रामगृहांचा समावेश आहे. या कार्डचे वार्षिक शुल्क 2,500 रुपये आहे.

Best Travel Cards There are many benefits to these credit cards
Best Travel Cards There are many benefits to these credit cardsDainik Gomantak

Axis विस्तारा सिग्नेचर क्रेडिट कार्ड

यामध्ये ग्राहकांना विस्तारा सदस्यत्वाचा लाभ मिळतो. यासह, भारतामध्ये स्थित विस्तारा लॉन्जच्या एक्सेसचाही समावेश आहे. यामध्ये ग्राहकांना 2.5 कोटी रुपयांपर्यंतचे हवाई अपघात कवचही मिळते. यामध्ये बोनस क्लब विस्तारा पॉइंट्स आणि प्रीमियम इकॉनॉमी तिकीट आणि इतर फायदे देखील मिळणार. या कार्डचे वार्षिक शुल्क 3,000 रुपये आहे.

Best Travel Cards There are many benefits to these credit cards
Best Travel Cards There are many benefits to these credit cardsDainik Gomantak

एअर इंडिया SBI सिग्नेचर क्रेडिट कार्ड

यामध्ये, एअर इंडिया पोर्टलद्वारे बुक केलेल्या एअर इंडियाच्या तिकिटांवर खर्च केलेल्या प्रत्येक 100 रुपयांसाठी 30 रिवॉर्ड पॉइंट्स उपलब्ध आहेत. यासोबत एअर इंडिया फ्रिक्वेंट फ्लायर प्रोग्राम फ्लाइंग रिटर्नचे सदस्यत्व, प्रायोरिटी पास प्रोग्रामसह 600 हून अधिक विमानतळ लॉजमध्ये प्रवेश इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.

Best Travel Cards There are many benefits to these credit cards
Best Travel Cards There are many benefits to these credit cardsDainik Gomantak

SBI Card Elite क्रेडिट कार्ड

यात ट्रायडेंट प्रिव्हिलेज मेंबरशिपसह क्लब विस्तारा मेंबरशिप आणि अपग्रेड व्हाउचरचा लाभ मिळतो. 1.99 टक्के विदेशी चलन मार्कअप शुल्क देखील उपलब्ध आहे. या कार्ड अंतर्गत, सहा नि:शुल्क आंतरराष्ट्रीय विमानतळ लॉजमध्ये प्रवेश मिळतो. यासोबतच दोन मोफत होम लाउंज आणि इतर फायदेही या कार्ड अंतर्गत मिळतो. या कार्डचे वार्षिक शुल्क 4,999 रुपये आहे.

Best Travel Cards There are many benefits to these credit cards
Best Travel Cards There are many benefits to these credit cardsDainik Gomantak

सिटी प्रीमियर माइल्स क्रेडिट कार्ड

हे 1 कोटी रुपयांपर्यंतचा हवाई अपघात विमा संरक्षणाची सोय या कार्ज अंतर्गत उपलब्ध आहे. यामध्ये एअरपोर्ट लॉजमध्ये प्रवेश आणि पार्टनर रेस्टॉरंट्सवर 20 टक्के बचत मिळते. तुम्ही 100 हून अधिक हॉटेल्स आणि एअरलाइन भागीदारांकडून माइल्स रिडीम करू शकता आणि ते कधीही कालबाह्य होत नाहीत. त्याची वार्षिक फी अर्जाच्या वेळी नमूद केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com