Best Job For Women: महिलांना सक्षम होण्यासाठी 'हे' आहेत 5 बेस्ट जॉब ऑप्शन! यशाचा मार्ग होईल खुला

जर तुम्ही नोकरीसाठी चांगला पर्याय शोधत असाल तर तुम्ही या फील्डमध्ये प्रयत्न करू शकता. हे पर्याय महिलांसाठी यशाचा मार्ग खुला करू शकतात.
Best Job For Women
Best Job For WomenDainik Gomantak
Published on
Updated on

Best Job For Women: आजच्या युगात आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे. प्रत्येक महिला प्रत्येक क्षेत्रात उतरत आहे. कोणतेही क्षेत्र त्यांच्यासाठी नाही असे म्हणता येणार नाही. 

एका अहवालानुसार, वर्ष 2023 मध्ये असे काही करिअर पर्याय आहेत. जे महिलांना चांगले यश देऊ शकतात. जाणून घेउया अशाच करिअरबद्दल जे यशाचा मार्ग करू खुला करुन आर्थिक बाजूने सक्षम बनवू शकतील.

फार्मासिस्ट

कोरोनानंतर या क्षेत्रात चांगली तेजी आली आहे. जी यापुढेही कायम राहण्याची अपेक्षा आहे. महिला या क्षेत्रात करिअर करू शकतात. 

हेल्थकेअर उद्योगात फार्मासिस्ट महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्यांना खूप चांगला पगार मिळतो. ते हॉस्पिटल्स आणि फार्मास्युटिकल कंपन्यांसाठी काम करतात.

एयरोस्पेस इंजीनियर

विमान आणि अंतराळ यानाची रचना, विकास आणि उत्पादन यावर काम करणे हे एरोस्पेस अभियंत्याचे काम आहे. या कामात पैसाही चांगला आहे आणि महिलांच्या प्रगतीच्या चांगल्या संधी आहेत.

Best Job For Women
Healthy Tips: तुम्ही सॅलडमध्ये लिंबू अन् मीठ टाकतायं? वेळीच व्हा सावध

लॉयर

वकील बनून, जेव्हा तुम्ही एखाद्या क्षेत्रात स्पेशलायझेशन मिळवता तेव्हा त्या बाबतीत चांगले पैसे मिळवता येतात. जसे कॉर्पोरेट कायदा, बौद्धिक संपदा कायदा किंवा वैद्यकीय कायदा. आता तुम्ही एखाद्या विशिष्ट क्षेत्रात स्पेशलायझेशन केले तर या क्षेत्रात चांगली कमाई होते. ही महिलांसाठी सर्वाधिक पगाराची नोकरी आहे.

सोशल मीडिया

सोशल मीडियाच्या क्षेत्रात करिअर करूनही महिला चांगली कमाई करू शकतात. गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात मोठे बदल झाले असून, काही वर्षांत पगार आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे. वाढत्या अनुभवाने या क्षेत्रात वर्षाला 5 ते 10 लाख रुपये सहज कमावता येतात.

मार्केटिंग मॅनेजर

आजकाल स्त्रिया पण मार्केटिंग क्षेत्रात येत आहेत आणि चांगली कमाई करत आहेत. चांगल्या पदवी आणि काही अनुभवानंतर या क्षेत्रात करिअर करता येते. येथे आल्यानंतर खूप चांगल्या पगाराच्या ऑफर आहेत, त्यामुळे तुम्ही 2023 मध्ये या करिअर पर्यायाचाही विचार करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com