November महिन्यात बँकांना 10 दिवस सुट्टी, महत्वाची कामे घ्या उरकून

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात विविध सणांमुळे अनेक दिवस बँका बंद होत्या.
Bank Holiday
Bank HolidayDainik Gomantak
Published on
Updated on

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात विविध सणांमुळे अनेक दिवस बँका बंद होत्या. नोव्हेंबर महिन्यातही काही दिवस बँकेचे कामकाज बंद राहणार आहे. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये कमी सुट्या आहेत. सणासुदीचे बहुतांश दिवस संपले असल्याने नोव्हेंबर महिन्यात फक्त दहा दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये दुसरा आणि चौथा शनिवार, रविवार यांचा समावेश आहे.

Bank Holiday
7th Pay Commission: महागाईच्या सवलतीबाबत केंद्र सरकारचे मोठे वक्तव्य, म्हणाले...

आरबीआयच्या सुट्टी यादी आणि वेगवेगळ्या राज्यांच्या महत्त्वाच्या तारखांनुसार, केंद्रीय रिझर्व्ह बँक आपल्या वेबसाइटवर बँकांच्या सुट्ट्यांची माहिती देते. रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटनुसार, विविध राज्यांमध्ये 1, 8, 11 आणि 23 नोव्हेंबर रोजी बँकांना सुट्ट्या आहेत.

1 नोव्हेंबर रोजी कन्नड राज्योत्सव/कुट पर्व आहे, तर 8 नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंती/कार्तिका पौर्णिमा/रहस पौर्णिमा मुळे बहुतांश राज्यांमध्ये बँका बंद राहतील. याशिवाय, 11 नोव्हेंबर रोजी कनकदास जयंती/वंगळा महोत्सव आणि 23 नोव्हेंबर रोजी सेंग कुत्स्नेमच्या निमित्ताने काही राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.

Bank Holiday
PNB-यूनियन-इंडियन बँक ग्राहकांचे बल्ले-बल्ले, RBI गव्हर्नरांची मोठी घोषणा

एक नोव्हेंबरला कर्नाटक, मणिपूरमध्ये बँका बंद राहणार आहेत. तसेच, 11 नोव्हेंबर रोजी कर्नाटक, मेघालयमध्ये बँकेत कोणतेही काम होणार नाही. तसेच मेघालयमध्ये 23 नोव्हेंबरला बँका बंद आहेत. त्यामुळे या सुट्टया विचारात घेऊनच बँकेतील कामाचे नियोजन करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com