Banking Budget 2022: 100 % पोस्ट ऑफिस आता ऑनलाईन बँकिंगने जोडण्यात येणार

सर्व पोस्ट ऑफिस डिजिटल आणि ऑनलाईन बँकिंगने जोडण्यात येणार
Banking Budget 2022
Banking Budget 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 2022 च्या अर्थसंकल्पमध्ये पोस्ट ऑफिस तसेच बँकांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. 2022-23 चा अर्थसंकल्प सादर करताना त्या म्हणाल्या की, 100 % पोस्ट ऑफिस ही ऑनलाईन बँकिंगने जोडण्यात येणार आहेत. म्हणजेच एकूण 1.5 कोटी पोस्ट ऑफिसचा (Post Office) यामध्ये समावेश होतो. या मुळे पोस्ट ऑफिस मधील डिजिटल व्यवहार विना अडथळा होतील तसेच वेळेची बचत होईल. (Banking Budget 2022: post offices will be connected to online banking)

Banking Budget 2022
Budget 2022 Highlights: लघु-मध्यम उद्योगांसाठी मोठी घोषणा

पोस्ट आणि अन्य बँका आर्थिक दृष्ट्या जोडल्या गेल्याने आर्थिक व्यवहारासाठी ते फायदेशीर ठरणार आहे. तसेच यापूर्वी एकूण 75 जिल्ह्यात डिजिटल पेमेंट आणि डिजिटल बँकिंग सुरू असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman Budget) यांनी दिली.

आज सादर करण्यात येणारे बजेट (India Budget 2022) हे महागाईचा आलेख खाली आणणारा असेल का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. आज सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी मंत्रिमंडळ बैठक पार पडली आसून, सकाळी 11 वाजता त्यांच्या अर्थसंकल्पाच्या भाषणाला सुरुवात झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com