बँक ऑफ बडोदाचे लोन झाले महाग, 12 जुलैपासून नवीन दर लागू, जाणून घ्या

सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज बँक ऑफ बडोदाने पुन्हा एकदा कर्ज महाग केले आहे.
Bank Of Baroda
Bank Of Baroda Dainik Gomantak
Published on
Updated on

Bank Of Baroda Hikes Interest Rate: सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज बँक ऑफ बडोदाने पुन्हा एकदा कर्ज महाग केले आहे. बँक ऑफ बडोदाने SCLR (Marginal Cost of Lending Rates) मध्ये वाढ केली आहे. बँकेने आपल्या एमएलसीआरमध्ये 10 ते 15 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. बँक ऑफ बडोदाच्या या निर्णयामुळे गृहकर्ज घेणे महाग होणार आहे. त्याच वेळी, ज्या ग्राहकांनी आधीच गृहकर्ज घेतले आहे त्यांचा ईएमआय अधिक महाग होईल.

बँक ऑफ बडोदाने MCLR वाढवला

12 जुलैपासून एका वर्षाच्या कालावधीत MCLR 7.50 टक्क्यांवरुन 7.65 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्याच वेळी, 6 महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR 7.35 टक्क्यांवरुन 7.45 टक्के झाला आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत MCLR 7.25 टक्क्यांवरुन 7.35 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

Bank Of Baroda
बँक ऑफ बडोदा कडून अनेक मालमत्तांचा लिलाव..!

दुसरीकडे, बँक ऑफ बडोदाचा रेपो लिंक्ड लोन दर 7.45 टक्के आहे. कर्मचारी नसलेल्या सदस्यांसाठी गृहकर्जाचा दर 7.45 टक्के ते 8.80 टक्के आहे. तर कर्मचारी सदस्यांसाठी गृहकर्जाचा दर 7.45 टक्के आहे. बँक ऑफ बडोदाचे (Bank Of Baroda) कार लोन सध्या 7.70 टक्के ते 10.95 टक्के आहे.

Bank Of Baroda
RBI ने बँक ऑफ इंडिया अन् फेडरल बँकेला ठोठावला करोडोंचा दंड

इतर अनेक बँकांनीही MCLR वाढवला आहे

RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी MCLR वाढवून ग्राहकांना कर्ज घेणे महाग केले आहे. कॅनरा बँकेपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India), बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक (HDFC Bank), युनियन बँक ऑफ इंडिया अ‍ॅक्सिस बँक यासह इतर अनेक बँकांनी त्यांचा MCLR वाढवला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com