Bajaj Avenger 220 Street: स्टायलिश लूक अन् परवडणारी किंमत, बजाजची नवी बाईक ठरणार गेमचेंजर, बुलेट-हंटरला देणार टक्कर

Bajaj New Bike: भारतीय दुचाकी उत्पादक कंपनी बजाज लवकरच बाजारात एक नवीन बाईक लॉन्च करणार आहे. लॉन्च झाल्यावर ही बाईक रॉयल एनफील्ड बुलेट आणि हंटरला टक्कर देईल.
Bajaj Avenger 220 Street
Bajaj Avenger 220 StreetDainik Gomantak
Published on
Updated on

दुचाकी आणि तीन चाकी वाहन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी बजाज ऑटो आता क्रूझर बाईक सेगमेंटमध्ये आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने अ‍ॅव्हेंजर 220 स्ट्रीट ही लोकप्रिय क्रूझर बाइक भारतीय बाजारात पुन्हा सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीने या नव्या अ‍ॅव्हेंजर स्ट्रीट 220 मॉडेलसाठी होमोलोगेशन प्रक्रिया पूर्ण केली आहे, आणि लवकरच तिचे अधिकृत लाँचिंग होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या बाईकचे होमोलोगेशन दस्तऐवज नुकतेच इंटरनेटवर लीक झाले असून, त्यातून बाईकच्या काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांची माहिती समोर आली आहे.

Bajaj Avenger 220 Street
Goa Crime: प्रेमप्रकरणातून तरुणी गरोदर, युवकावर 'पॉक्सो' दाखल! पीडितेशी केला विवाह, खटल्यातून झाली सुटका

अ‍ॅव्हेंजर स्ट्रीट 220 ही क्लासिक लूक देण्यात आला आहे. यात कमी उंचीची सीट, पुढे पाय ठेवण्याची जागा आणि मागे झुकलेला हँडलबार आहे, ज्यामुळे रायडरला आरामदायक अनुभव मिळतो. स्ट्रीट मॉडेलमध्ये काळ्या थीमचा वापर करण्यात आला आहे, म्हणजेच बाईकचा बहुतांश भाग मॅट ब्लॅक किंवा ग्लॉसी ब्लॅक शेड्समध्ये असेल. यात क्रूझ मॉडेलप्रमाणे हाय विंडशील्ड, बॅकरेस्ट किंवा क्रोम डिटेल्स दिसणार नाहीत.

बाईकमध्ये 220cc ऑइल-कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे, जे 19.03 PS पॉवर आणि 17.55 Nm टॉर्क निर्माण करते. यात 5-स्पीड गिअरबॉक्सचा समावेश आहे. हेच इंजिन सध्या अ‍ॅव्हेंजर 220 क्रूझमध्येही वापरण्यात येते.

अ‍ॅव्हेंजर स्ट्रीट आणि क्रूझ दोन्ही क्लासिक क्रूझर शैलीतील बाइक्स आहेत. कमी उंचीची सीट, आणि मागे झुकलेला हँडलबार आहे, ज्यामुळे त्यावर बसणे खूप आरामदायक होते. परंतु दोघांमध्ये काही विशेष फरक आहेत.

एप्रिल 2025 मध्ये अ‍ॅव्हेंजर ब्रँडच्या फक्त 1,000 युनिट्सची विक्री झाली होती, आणि विक्रीत वर्षभरात 46% घट नोंदवली गेली होती. त्यामुळे अ‍ॅव्हेंजर स्ट्रीट 220 च्या पुनरागमनामुळे या ब्रँडला पुन्हा उभारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Bajaj Avenger 220 Street
Goa Bike Taxi: गोव्यातील बाईक टॅक्सी चालकांचा रोजगार धोक्यात; हाय कोर्टाच्या निकालानंतर आलेमाव यांनी व्यक्त केली चिंता

अ‍ॅव्हेंजर 220 स्ट्रीट ही अ‍ॅव्हेंजर 220 क्रूझपेक्षा थोडी स्वस्त असेल. क्रूझ मॉडेल सध्या ₹1.48 लाख (एक्स-शोरूम) मध्ये उपलब्ध आहे, तर स्ट्रीट आवृत्तीची संभाव्य किंमत ₹1.40 लाख किंवा त्याहून कमी असण्याची शक्यता आहे.

लाँचच्या तारखेची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी, पुढील काही आठवड्यांत बाईक बाजारात दाखल होण्याची अपेक्षा आहे. बजाजने अ‍ॅव्हेंजर स्ट्रीट 220 पुन्हा बाजारात आणून क्रूझर बाईकप्रेमींना एक नवीन पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, जो रॉयल एनफिल्डच्या एंट्री-लेव्हल मॉडेल्सना चांगली टक्कर देऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com