US सिटी बँकेची मालकी आता भारतीय बँकांकडे ?

सिटी बँकेच्या देशात 35 शाखा आहेत तसेच बँकिंग व्यवसायात 4,000 कर्मचारी आहेत.
Axis bank, Kotak Mahindra bank, IndusInd bank plant to invest in Citi bank
Axis bank, Kotak Mahindra bank, IndusInd bank plant to invest in Citi bank Dainik Gomantak
Published on
Updated on

देशातील तीन सर्वात मोठ्या खाजगी बँका कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank), अॅक्सिस बँक (Axis Bank) आणि इंडसइंड बँक (IndusInd bank) यांनी भारतातील यूएस सिटी बँकेचा (Citi Bank) ग्राहक व्यवसाय खरेदी करण्यासाठी बोली सादर केली आहे. एका वृत्त वाहिनीच्या वृत्तानुसार, तद्यांनी दिलेल्या माहितीनुसार . सिटी बँकेच्या सीईओ जेन फ्रेझर (Jane Fraser)यांच्या नेतृत्वाखाली यूएस बँक भारतासह 13 देशांमधील ग्राहक बँकिंग क्षेत्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्नात आहे.(Axis bank, Kotak Mahindra bank, IndusInd bank plant to invest in Citi bank)

या अहवालानुसार या ऑफर्स शुक्रवारी सादर करण्यात आल्या आहेत . याप्रकरणी येत्या दोन-तीन महिन्यांत सिटी बँक द्विपक्षीय बोलणी सुरू करणार असून या बोलींनंतर ज्यांनी सिटी बँक अधिकृत खरेदी करतील त्यांचं नावही जाहीर करण्यात आले आहे. बोली लावणाऱ्या कोणत्याही बँकांना आणखीन या बँकेचे शेअर्स देऊ केलेले नाहीत आणि संपूर्णपणे रोखीने बोली सादर केली आहे. अहवालात म्हटले आहे की सिंगापूरची डीबीएस बँक, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेने या कराराचे मूल्यांकन केले आहे, परंतु शेवटी सिंगापूरच्या बँकांनी बोली लावली नाही.

सिटी बँकेच्या व्यवसायांमध्ये क्रेडिट कार्ड, रिटेल बँका, गृहकर्ज आणि संपत्ती व्यवस्थापन यांचा समावेश असणार आहे . सिटी बँकेच्या देशात 35 शाखा आहेत तसेच बँकिंग व्यवसायात 4,000 कर्मचारी आहेत. नफ्याच्या बाबतीत, कॉर्पोरेट बँकिंग खाती 80 टक्क्यांहून अधिक आहेत. एकूणच, Citibank च्या भारतीय शाखाचा बाजारातील वाटा अनुक्रमे 0.6 टक्के असून बँकेच्या ठेवी 1.1 टक्के इतक्या आहेत.

मात्र, सिटी बँकेकडून या अहवालावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याचबरोबर अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि इंडसइंड बँकेच्या प्रवक्त्यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला आहे. तज्ञांच्या मते, संभाव्य खरेदीदार या संपादनाद्वारे त्यांचे क्रेडिट कार्ड आणि तारण व्यवसाय मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सिटी बँक 1902 मध्ये भारतात आली आणि 1985 मध्ये ग्राहक बँकिंग व्यवसाय सुरू केला. तथापि, बँकेचा कार्ड व्यवसाय गेल्या दशकात 2% च्या CAGR सह सहाव्या स्थानावर घसरला आहे. परंतु सरासरी कार्ड खर्च एकूण उद्योगापेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपर्यंत, सिटी बँकेकडे 2.9 दशलक्ष किरकोळ ग्राहक आणि 1.2 दशलक्ष बँक खाती होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com