Salary: अरे ये क्या! वेतनवाढीबाबत आला मोठा अहवाल, यावर्षी होऊ शकते...

Salary Hike: कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पगार मिळतो आणि दरवर्षी आर्थिक वर्षानंतर लोकांनाही पगारवाढीची अपेक्षा असते.
Money
MoneyDainik Gomantak
Published on
Updated on

Salary Hike: कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पगार मिळतो आणि दरवर्षी आर्थिक वर्षानंतर त्यांना पगारवाढीची अपेक्षा असते.

त्याचवेळी, 2022-23 आर्थिक वर्ष संपत आहे. अशा स्थितीत यावेळीही कर्मचाऱ्यांना पगार वाढण्याची अपेक्षा आहे.

तथापि, पगार किती वाढेल हे प्रत्येक क्षेत्र आणि कंपनीच्या नफा-तोटा आणि इतर मापदंडांवर अवलंबून असते. मात्र, आता पगारवाढीचा अहवाल समोर आला असून, त्यात सरासरी वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.

अर्थव्यवस्थेत मंदी

चलनवाढ, उच्च व्याजदर आणि मंदावलेली अर्थव्यवस्था (Economy) यामुळे या वर्षी सर्व क्षेत्रातील सरासरी पगारवाढ 9.1 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.

याचा अंदाज एका अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे. डेलॉइट इंडियाने जारी केलेल्या 'टॅलेंट सिनेरियो 2023' अहवालानुसार, गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये पगारात सरासरी 9.4 टक्के वाढ झाली होती.

हा अभ्यास जानेवारी 2023 मध्ये सात क्षेत्र आणि 25 उप-क्षेत्रांमधील 300 संस्थांमध्ये केलेल्या सर्वेक्षणावर आधारित आहे.

Money
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, DA पुन्हा एकदा वाढणार!

पगारवाढ

अभ्यासात असे आढळून आले आहे की, 2023 मध्ये वास्तविक वेतन वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी होण्याची शक्यता आहे. यानुसार, जीवन विज्ञान क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक पगारवाढ अपेक्षित आहे, तर माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात या काळात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.

Money
7th Pay Commission: 4 टक्के DA वाढीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

नोकरी सोडण्याचे प्रमाण कमी असेल

अभ्यासात असे म्हटले आहे की, देशातील कर्मचार्‍यांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण 2022 मध्ये 19.7 टक्क्यांवर पोहोचले होते, तर 2021 मध्ये ते 19.4 टक्के होते.

आनंदरुप घोष (Deloitte India), म्हणाले की, “या वर्षी महागाई (Inflation), उच्च व्याजदर आणि मंदावलेली अर्थव्यवस्था यामुळे संस्था अधिक सावध राहण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये वेतनवाढ आणि नोकरी सोडण्याचे प्रमाण कमी असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com