auto story nitin gadkari launches green hydrogen based fuel cell electric vehicle toyota mirai
auto story nitin gadkari launches green hydrogen based fuel cell electric vehicle toyota miraiDainik Gomantak

पेट्रोलसह सीएनजीचा पडणार विसर, मार्केटमध्ये नवीन वाहन दाखल

हवामानातील कामगिरीचा अभ्यास आणि मूल्यांकन करण्यासाठी एक पायलट प्रकल्प जारी
Published on

पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर भारतात नवीन वाहन दाखल करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ग्रीन हायड्रोजनवर चालणारे प्रगत इंधन सेल इलेक्ट्रिक वाहन (FCEV) टोयोटा मिराई सादर केले आहे.

गडकरी म्हणाले की, भारतात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे, ज्याचा उद्देश देशात अशा वाहनांना चालना देण्याचा आहे. ते म्हणाले की ते पूर्णपणे पर्यावरणपूरक (Environment) आहे.

auto story nitin gadkari launches green hydrogen based fuel cell electric vehicle toyota mirai
मुलाने केली वडिलांची हत्या, कारण वाचून बसेल धक्का

टोयोटा किर्लोस्कर मोटर आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (ICAT) हायड्रोजनवर चालणाऱ्या FCEV टोयोटा मिराईचा भारतीय रस्त्यांवर आणि सर्व हवामानातील कामगिरीचा अभ्यास आणि मूल्यांकन करण्यासाठी एक पायलट प्रकल्प (Project) चालवत आहेत. अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, टाटा मोटर्स त्यांच्या वाहनांची लाइनअप सतत अपडेट करत असते. गेल्या काही महिन्यांत अनेक नवीन वाहने बाजारात दाखल झाली आहेत. यामध्ये नवीन पंच, डार्क एडिशन रेंज आणि नुकत्याच लाँच झालेल्या काझीरंगा एडिशनचा समावेश आहे. यासोबतच कंपनीने सीएनजी (CNG) टियागो आणि सीएनजी टिगोरही बाजारात आणली आहे.

कंपनी आता मोठे बॅटरी पॅक असलेले अपडेटेड नेक्सन इव्ही लाँच करणार आहे. पण त्याआधीच कंपनीने सध्याच्या नेक्सन इव्ही च्या किमती 25 हजार रुपयांनी वाढवल्या आहेत. नेक्सॉन इलेक्ट्रिकचे सर्व मॉडेल महाग झाले आहेत. याशिवाय टाटाने आपल्या पेट्रोल/डिझेल (Diesel) कारच्या किमती 3 HAहजार रु.ने वाढवल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com