Apple-Google Launch Mobile Phones: ॲपल पाठोपाठ गुगल देखील करणार Google Pixel 8 Pro लॉन्च

Google Pixel 8 Pro: ऑक्टोबर महिन्यात लॉंच करण्याची शक्यता आहे.
Google Pixel
Google PixelDainik Go
Published on
Updated on

Google Pixel 8 Pro: जगप्रसिद्ध आणि लोकप्रिय अशी मोबाईल कंपनी अॅपल सप्टेंबर 2023मध्ये iPhone 15 लॉंच करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. आता अॅपल पाठोपाठ गुगल देखील Google Pixel 8 Pro हा फोन ऑक्टोबर महिन्यात लॉंच करण्याची शक्यता आहे.

गुगल हा फोन कधी लॉंच करणार याची तारीख जरी माहीत नसली तरी या फोनचे फीचर्स समोर आले आहेत. चला तर जाणून घेऊयात गुगलच्या या फोनमध्ये काय विशेष आहे.

  • डिस्प्ले आणि स्क्रीन

    फोनमध्ये 6.7-इंचाचा QHD, LTPO OLED डिस्प्ले असेल जो 120 Hz वर रिफ्रेश होईल. ही एक अतिशय गुळगुळीत आणि प्रतिसाद देणारी स्क्रीन असेल जी गेम खेळण्यासाठी आणि व्हिडिओ पाहण्यासाठी उत्तम असेल.

  • हा फोन Google च्या नेक्स्ट-gen Tensor G3 चिपसेटद्वारे बनवल्याची शक्यता आहे. नेक्स्ट-gen Tensor G3 हा एक जास्त क्षमता असलेला प्रोसेसर आहे जो सर्व प्रकारची कामे सहजतेने हाताळू शकतो.

  • स्टोरेज क्षमता

Pixel 8 Pro मध्ये दोन स्टोरेज पर्याय असण्याची अपेक्षा आहे. एक 12GB RAM आणि 128GB स्टोरेजसह आणि दुसरा 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असे दोन स्टोरेज असून शकतात. वापरकर्त्यावर अवलंबून असेल की, तो कोणता पर्याय निवडतो.

  • Google Pixel 8 Pro कॅमेरा

Google Pixel 8 Pro उत्तम कॅमेरा असणार आहे. फोनमध्ये OIS सह 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 64-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि टेलीफोटो लेन्ससह 48-मेगापिक्सेल कॅमेरा असेल. फ्रंट कॅमेरा 11 मेगापिक्सल्सचा असल्याचे सांगण्यात येत आहे. कॅमेरा सिस्टीमला Google च्या AI-आधारित कॅमेरा सॉफ्टवेअरद्वारे बनवलेले आहे.

Google Pixel
Sahara Refund Portal: दहा कोटी गुंतवणुकदारांसाठी आनंदाचा दिवस! 'सहारा'मध्ये अडकलेले पैसे माघारी मिळणार; अशी आहे प्रोसेस
  • बॅटरी

Google Pixel 8 Pro मध्ये मोठी बॅटरी आणि लवकर चार्जिंग होण्याची सोय असेल. फोनमध्ये 4,950mAh बॅटरी असेल, ज्यामुळे दीर्घ काळापर्यत बॅटरी चालेल. हे 27W वायर्ड चार्जिंगला देखील सपोर्ट करेल, ज्यामुळे ते लवकर चार्ज होईल.

  • Google Pixel 8 Pro ची अपेक्षित किंमत

Google Pixel 8 ची किंमत 60,000 रुपयांपेक्षा जास्त असू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. Google Pixel 8 ची किंमत $ 649 (सुमारे 53,450 रुपये) किंवा $ 699 (सुमारे 57,570 रुपये) असू शकते. जर Google Pixel 8 ची किंमत आधीपेक्षा जास्त असेल, तर ती भारतात 60,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीला लॉन्च होऊ शकते, असे म्हटले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com