Apple Festive Season Sale: रविवारपासून अ‍ॅपलवर फेस्टिव्ह सीझन सेल; आयफोन, मॅकबुकवर मोठी सूट मिळण्याची शक्यता

पुढील आठवड्यापासून अ‍ॅपलवर फेस्टिव्ह सीझन सेल सुरू होणार आहे.
Apple Festive Season Sale
Apple Festive Season Sale
Published on
Updated on

Apple Festive Season Sale: सणासुदीच्या काळात फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन सारख्या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर मेगा सेल सुरू आहे. या सेलदरम्यान स्मार्टफोन, टीव्ही, स्मार्टवॉच अशा अनेक गोष्टी कमी किमतीत खरेदी करून पैसे वाचवण्याची संधी आहे.

दरम्यान, पुढील आठवड्यापासून अ‍ॅपलवर फेस्टिव्ह सीझन सेल सुरू होणार आहे. या काळात आयफोन, मॅकबुक सारखी अ‍ॅपलची विविध उत्पादने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे.

Apple सोमवारपासून भारतात सेल करण्यासाठी सज्ज आहे. आगामी सेल दरम्यान, iPhones, iPads, AirPods, Macs यासह अनेक उत्पादनांवर प्रचंड सूट अपेक्षित आहे.

भारतात Apple च्या ऑनलाइन स्टोअरवर फेस्टिव्ह सीझन सेल सुरू होईल. ग्राहकांना स्वस्त आणि चांगल्या डीलची सुविधा ऑफलाइन माध्यमातून साकेत, दिल्ली येथील ऍपल स्टोअर आणि मुंबईतील ऍपल बीकेसी स्टोअर्समध्ये उपलब्ध होईल.

Apple च्या या फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये iPhone, MacBook किंवा Apple प्रॉडक्ट प्रेमींना अधिक चांगली डील मिळेल. Amazon Great Indian Festival Sale किंवा Flipkart Big Billion Day Sale प्रमाणे Apple Festive Season Sale देखील कार्ड वापरून खरेदी करून पैसे वाचवण्याची संधी आहे.

Apple नवीन उत्पादनावर ऑफर देण्याची आशा आहे, यात iPhone 15 सेरिज आणि M2 MacBook Air यांचा समावेश आहे. याशिवाय, कंपनी सवलतीसह iPhone 13, iPhone 14 आणि M1 MacBook Air सारख्या जुन्या उत्पादनांची विक्री करू शकते.

ऍपल फेस्टिव्ह सीझन सेल दरम्यान, ग्राहकांना एक्सचेंज बोनस आणि बँक ऑफरद्वारे डीलमध्ये आणखी सुधारणा करण्याची संधी मिळू शकते. याशिवाय केस, कव्हर्स आणि चार्जरसह ऍपल ऍक्सेसरीज देखील सेल दरम्यान सूट दिली जाऊ शकते.

याशिवाय, ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या प्लॅटफॉर्मवर ऍपल उपकरणांवर सध्या भरपूर ऑफर उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, iPhone 14 (128GB) Flipkart वर Rs 56,999 मध्ये उपलब्ध आहे आणि iPhone 13 Amazon वर Rs 49,499 मध्ये उपलब्ध आहे. ही बातमी लिहिपर्यंत ही किंमत Amazon आणि Flipkart वर दिसत होती, आता त्यात बदल दिसू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com