अॅपलच्या iPhone 14 च्या सीरिजची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. अॅपलचा (Apple ) मेगा लाँच इव्हेंट काल मोठ्या उत्साहात पार पडला. कॅलिफॉर्नियाच्या Apple Park मध्ये अॅपलचा ‘फार आऊट इव्हेंट’ संपन्न झाला आहे. या कार्यक्रमामध्ये अॅपलने आपले नवीन आयफोन, अॅपल वॉच आणि एअरपॉड्स प्रो 2 यांच्यासह लाँच केले आहे
अखेर अॅपलचा मेगा लाँच इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये अॅपलने iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Pro Max, iPhone 14 Pro Max Ultra हे फोन लाँच केले. यासह Apple Watch Series 8 आणि AirPods Pro 2 हे देखील या इव्हेंटमध्ये लाँच करण्यात आले. त्यामुळे अॅपलच्या iPhone 14, Apple Watch Series 8 आणि AirPods Pro 2 यांच्या लाँचची वाट पाहणाऱ्या युजर्समध्ये आनंद पाहायला मिळाले आहे.
iPhone 14 ची वैशिष्ट्ये –
कंपनीने iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मध्ये अनेक अपडेटेड फीचर्स दिले आहेत. i
Phone 14 सीरिजमधील फोनमधून सिम स्लॉट काढून टाकण्यात आला आहे.
सध्या, फक्त यूएस मॉडेलसाठी सिम स्लॉट काढला गेला आहे.
आगामी काळात भारतीय मॉडेल्समध्ये सिम स्लॉट दिला जाऊ शकतो. iPhone 14 फक्त E-SIM वर काम करेल.
iPhone 14 चा कॅमेरा
iPhone 14 आणि iPhone 14 Plus मध्ये दोन 12 MP कॅमेरा सेन्सर आहे. iPhone 14 Pro मध्ये 48MP चा कॅमेरा आहे. iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मध्ये 1TB पर्यंतचे स्टोरेज ऑप्शन दिला आहे. iPhone 14 Max मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले असून इनहाऊस चिपसेट A15 वापरण्यात आला आहे.
iPhone 14 या कलरमध्ये उपलब्ध –
iPhone 14 च्या लेटेस्ट सिरीज मध्ये कंपनीने मिनी फोनचे ऑप्शन ठेवलेले नाही. पर्पल, एल्फाईन ग्रीन, सीअरा ब्लू, ग्रॅफाईट या कलर ऑप्शनमध्ये हे नविन ऑयफोनचे मॉडेल्स उपलब्ध होणार आहेत. 7 ऑक्टोबर पासून हे फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
iPhone 14 सीरिजच्या किमती –
iPhone 14 – 799 डॉलर म्हणजेच 63,000 रुपये
iPhone 14 Plus – 899 डॉलर म्हणजे 71,000 रुपये
iPhone 14 Pro – 999 डॉलर म्हणजे 79,000 रुपये
iPhone 14 Max – 1099 डॉलर म्हणजे 87,000 रुपये
Apple Watch Ultra आणि AirPods चे वैशिष्ट्य –
iPhone 14 च्या लेटेस्ट सिरीजसह कंपनीने Apple Watch Series 8 आणि AirPods Pro 2 देखील लाँच केले आहेत. Apple Watch Series 8 मध्ये मोठा डिस्प्ले मिळणार आहे. बॉडी-टेम्परेचर सेंसर सहित जास्तीत जास्त हेल्थ फीचर्स या स्मार्टवॉचमध्ये देण्यात आले आहेत.
Apple Watch स्वतःच्या GPS फीचर्ससह लाँच झाले आहे. या वॉचचे खास वैशिष्टय म्हणजे वॉच युजरच्या हेल्थवर लक्ष ठेवणार आहे. वॉच घातलेल्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास हे वॉच त्यांना मोठ्या आवाजात सिग्नल देईल. स्कूबा डायव्हिंगसारखे डीप डायव्हिंग सेशन करतानाही तुम्ही हे वॉच घालू शकता असा दावा कंपनीने केला आहे. 9 सप्टेंबरपासून याची प्री बुकींग सुरु होणार आहे.
Apple Watch Ultra आणि AirPods ची किंमत –
– Apple Watch SE 2 – 29,900 रुपये
– Apple Watch Series 8 – 45900 रुपये
– AirPods Pro – 26900 रुपये
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.