Anil Ambani: नवं वर्ष अनिल अंबानीसाठी लाभदायी; सरकारबरोबर केली 128 कोटींची डील

Anil Ambani: अनिल अंबानी हे एकेकाळी भारताच्या औद्योगिक जगताचा चमकता तारा होते. मात्र, काही वर्षातच त्यांचं आर्थिक साम्राज्य ढासळलं.
Anil Ambani
Anil AmbaniDainik Gomantak
Published on
Updated on

Anil Ambani: अनिल अंबानी हे एकेकाळी भारताच्या औद्योगिक जगताचा चमकता तारा होते. मात्र, काही वर्षातच त्यांचं आर्थिक साम्राज्य ढासळलं. अनिल अंबानींच्या सर्व कंपन्या सध्या मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. त्यांच्या कंपन्या विकल्या जात आहेत. त्यांनी स्वतःही आपली संपत्ती शून्य असल्याचे जाहीर केले. अशा स्थितीत आता त्यांनी सरकारशी मोठा करार केला आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर आणि THDC इंडिया लिमिटेड यांच्यात करार झाला आहे.

दरम्यान, रिलायन्स पॉवरने अरुणाचल प्रदेशातील आपला 1,200 मेगावॅट कलाई-2 जलविद्युत प्रकल्प सरकारी कंपनीला विकण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांमध्ये करार झाला आहे. हा करार 128 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 35 वर्षे जुनी THDC India Limited ही NTPC च्या मालकीची आहे आणि ती एक मिनी रत्न कंपनी आहे. दुसरीकडे, कालाई पॉवर लिमिटेड ही रिलायन्स पॉवरच्या उपकंपन्यांपैकी एक आहे. जी सरकारी कंपनी खरेदी करणार आहे.

Anil Ambani
Anil Ambani: LIC ला मोठा झटका, अनिल अंबानींच्या कंपनीत बुडणार 3,400 कोटी रुपये!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरुणाचल प्रदेश सरकार, रिलायन्स पॉवरची उपकंपनी कालाई पॉवर आणि THDC यांनी 30 डिसेंबर 2023 रोजी या करारावर स्वाक्षरी केली. करारानुसार, अरुणाचल प्रदेशातील लोहित नदी खोऱ्यात असलेल्या प्रस्तावित 1,200 मेगावॅट क्षमतेच्या कालाई-II जलविद्युत प्रकल्पाचे डेव्हलपमेंट राइट्स आणि रिलेटिड फिजिकल असेट्स, स्टडी, मंजुरी, डिझाइन आणि इंटलेक्चुअल प्रॉपर्टी THDC कडे हस्तांतरित केली जाईल. हा करार एकूण 128.39 कोटी रुपयांचा असून जो काही अटींवर आधारित आहे.

Anil Ambani
Anil Ambani: कर्जात बुडालेली कंपनी खरेदी करण्यासाठी 4 कंपन्यांनी दाखवले स्वारस्य!

रिलायन्स पॉवरचे शेअर्स वधारले

दरम्यान, या डीलनंतर रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली आहे. दुपारी 2:25 वाजता कंपनीचे शेअर्स 0.63 टक्क्यांच्या वाढीसह 24.10 रुपयांवर व्यवहार करत होते. ट्रेडिंग सत्रात कंपनीच्या शेअर्सने 24.44 रुपयांचा उच्चांक गाठला. मात्र, आज कंपनीचे शेअर्स 24.13 रुपयांवर उघडला. एका दिवसापूर्वी कंपनीचे शेअर 23.95 रुपयांवर बंद झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com