Amul News Today: देशातील प्रत्येक घराघरात आपली ओळख निर्माण करणाऱ्या दिग्गज डेअरी कंपनी अमूल (अमूल लिमिटेड) च्या व्यवस्थापनात मोठा बदल झाला आहे. या बदलानंतर कंपनीचे एमडी आरएस सोढी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोढी यांच्या राजीनाम्यानंतर आता GCMMF सीओओ जयन मेहता ही जबाबदारी स्वीकारतील.
सोढी गेली 12 वर्षे ही जबाबदारी सांभाळत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2010 मध्ये त्यांनी अमूल कंपनीत सीनियर मॅनेजर पदावरुन करिअरला सुरुवात केली. त्यांचे काम पाहून कंपनीने त्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांसाठी वाढवला.
आरएस सोधी यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास, त्यांनी 1982 मध्ये पहिल्यांदा अमूलमध्ये प्रवेश घेतला होता, त्यानंतर त्यांनी 2000-2004 मध्ये जनरल मॅनेजिंग मार्केटिंगची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर 2010 मध्ये त्यांना कंपनीच्या एमडीची जबाबदारी देण्यात आली. त्याचवेळी, जुलै 2022 मध्ये, त्यांना इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष बनवण्यात आले.
बोर्डाच्या अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा (Resignation) स्वीकारला आहे. सोढी यांच्या राजीनाम्यानंतर जयन मेहता आता त्यांची जबाबदारी स्वीकारणार आहेत. याआधीही जयन मेहता यांना प्रभारी बनवण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.