Ampere Zeal: इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची आहे, पण बजेट कमी आहे? मग जबरदस्त फिचर देणारी ही बाईक तुमच्यासाठीच

कंपनीने एकूण तीन रंगांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच केले आहे.
Ampere Zeal
Ampere ZealDainik Gomantak
Published on
Updated on

इलेक्ट्रिक स्कूटरच्या उत्साही लोकांसाठी मार्केटमध्ये अनेक पर्याय उपल्बध होत आहे. येत्या काही दिवसांत अनेक ब्रँड स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉंच करणार आहेत. ज्या कमी खर्चात उत्तम ड्रायव्हिंग रेंज देणार आहेत. आता ग्रीव्स इलेक्ट्रिक मोबिलिटी (Greaves Electric Mobility) ने भारतात नवीन Ampere Zeal 'Zeal EX' इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच करण्याची घोषणा केली आहे. स्कूटरची सुरुवातीची किंमत मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये 69,900 रुपये आहे. त्याच वेळी, भारतातील इतर सर्व राज्यांमध्ये त्याची किंमत 75,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, 31 मार्च 2023 पूर्वी स्कूटर खरेदी करणाऱ्यांसाठी ग्रीव्हजने 6,000 रुपयांपर्यंतचे फायदेही जाहीर केले आहेत. कंपनीने नवीन Ampere Zeal EX इलेक्ट्रिक स्कूटरला स्पोर्टी लूक आणि डिझाइन दिले आहे. ही स्कूटर दैनंदिन प्रवासासाठी एक चांगला पर्याय बनू शकेल अशा प्रकारे डिझाइन केले आहे. हेडलॅम्प त्याच्या ऍप्रनवर आणि इंडिकेटर हँडलबारवर ठेवलेले आहेत. ही स्कूटर फक्त तीन रंगांमध्ये लॉंच करण्यात आली आहे. ज्यात स्टोन ग्रे, व्हाइट आणि इंडिगो ब्लू यांचा समावेश आहे.

Ampere Zeal EX इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने 2.3kWh क्षमता असलेली लिथियम-आयन बॅटरीचा वापर केला आहे. जो एका चार्जमध्ये 120 किलोमीटरपर्यंत (ARAI) प्रमाणित ड्रायव्हिंग रेंज देतो. यात 1.8kW ची इलेक्ट्रिक मोटर आहे आणि तिचा टॉप स्पीड 50 ते 55 किलोमीटर प्रति तास आहे. कंपनीचा दावा आहे की त्याची बॅटरी अवघ्या 5 तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते.

Ampere Zeal
Facebook Blue Tick : मार्क झुकरबर्गही एलन मस्कच्या वाटेवर! ब्ल्यू टिकसाठी आता ट्विटरपेक्षाही जास्त पैसे मोजावे लागणार

या 150 किलोग्रॅमच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये काही मूलभूत वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत. ज्यामध्ये साइड स्टँड सेन्सर आणि राइडिंग मोड इत्यादींचा समावेश आहे. यात पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मागील बाजूस ट्विन ट्यूब सस्पेन्शन आहे. ड्रम ब्रेकसह सुसज्ज असलेल्या या स्कूटरसह, कंपनी 3 वर्षांची वॉरंटी देखील देत आहे, ज्यामध्ये बॅटरी, चार्जर, इलेक्ट्रिक मोटर, कंट्रोलर आणि कन्व्हर्टर यांचा समावेश आहे.

  • मोठी बचत

कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही या इलेक्ट्रिक स्कूटरची सामान्य पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटरशी तुलना केली तर मोठी बचत होईल. हे कॅल्क्युलेटर दाखवते की, जर तुम्ही दिवसाला 100 किमी चालवत असाल आणि तुमची ICE इंजिन स्कूटर सुमारे 40 kmpl मायलेज देत असेल, तर या पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत तुम्ही दरमहा सुमारे 7,000 रुपये आणि वर्षाला 85,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. या हिशोबात पेट्रोलची सरासरी किंमत 100 रुपये प्रतिलिटर ठेवण्यात आली आहे.

  • आकर्षक ऑफर

या इलेक्ट्रिक स्कूटरची खरेदी सुलभ करण्यासाठी कंपनी आकर्षक फायनान्स ऑफर देखील देत आहे. या स्कूटरसाठी कंपनी देशातील विविध बँकांमार्फत 80 टक्क्यांपर्यंत वित्तपुरवठा करत आहे. जे फक्त 8.99% च्या प्रारंभिक व्याज दरासह येतात. याबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही कंपनीच्या अधिकृत डीलरशी संपर्क साधू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com