Amazon Prime Video पाहणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. रिपोर्ट्सनुसार, Amazon Prime Video ची किंमत वाढू शकते. वास्तविक, प्राइम व्हिडिओच्या ग्राहकांची संख्या सातत्याने कमी होत आहे. कोरोना काळापासून ग्राहकांची संख्या घटली आहे. अशा परिस्थितीत Amazon Prime Video ने एक नवीन स्ट्रॅटेजी आखली आहे. ज्या अंतर्गत कंपनी आपल्या काही सबस्क्रिप्शनसह जाहिराती प्रदर्शित करु शकते. तसेच काही प्लॅन महाग करु शकते.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, प्राइम व्हिडिओ एक स्वस्त प्लॅन आणण्याचा विचार करत आहे, ज्यामध्ये जाहिराती दाखवल्या जातील. हा प्लॅन Netflix सारखाच असेल, ज्याने काही काळापूर्वी सदस्यता शुल्क वाढवल्यानंतर जाहिरात-समर्थित प्लॅन सादर केला होता. प्राइम व्हिडिओच्या स्वस्त प्लॅनमधील जाहिरातींची संख्या नेटफ्लिक्सपेक्षा कमी असू शकते.
दुसरीकडे, प्राइम व्हिडिओचा स्वस्तातला प्लॅन पहिल्यांदा यूएस, यूके, जर्मनी आणि कॅनडामध्ये लॉन्च केला जाईल. यानंतर तो फ्रान्स, इटली, स्पेन, ऑस्ट्रेलिया आणि मेक्सिकोमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. जाहिरातमुक्त सेवेचा आनंद घेण्यासाठी, तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागेल. मात्र, भारताबाबत सध्या कोणतीही माहिती नाही.
Amazon Prime Video च्या जाहिरात-मुक्त प्लॅनची किंमत वाढू शकते. सध्या, हा प्लॅन $14.99 प्रति महिना किंवा $139 प्रति वर्ष उपलब्ध आहे. तथापि, पुढील वर्षापासून, तो प्रति महिना $17.98 किंवा प्रति वर्ष $141.99 मध्ये उपलब्ध असू शकते. प्राईम व्हिडिओच्या स्वस्त प्लॅनमध्ये जाहिरातींचा समावेश करण्याच्या निर्णयामुळे ही वाढ होऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.