Amazon Prime Day Sale: छोट्या उद्योजकांना होईल मोठी मदत

भारतात कंपनी अनेक दिवसांपासून लघू आणि मध्यम उद्योगांना मदतीसाठी काम करत असून त्याचाच एक भाग म्हणून हा अ‍ॅमेझॉन प्राइम डे(Amazon Prime Day) असणार आहे.
Amazon Prime Day Sale: Will be a big help to small entrepreneurs
Amazon Prime Day Sale: Will be a big help to small entrepreneursDainik Gomantak
Published on
Updated on

Amazon Business ने प्राइम डे विक्री दरम्यान व्यवसाय खरेदीदारांसाठी अनेक आकर्षक डील्स जाहीर केल्या आहेत. अ‍ॅमेझॉन बिझिनेसचे संचालक पीटर जॉर्ज म्हणाले की, 26 आणि 27 जुलै रोजी भारतात अमॅझॉनच्या वार्षिक प्राइम डे सेल दरम्यान छोटे आणि मध्यम व्यापारी लोक मोठ्या प्रमाणात फायदा घेऊ शकतात.(Amazon Prime Day)

त्यांनी सांगितले की 26 आणि 27 जुलै रोजी प्राइम डे दरम्यान अमॅझॉन बिझिनेस वनप्लस,ॲपल , इंटेल, एएमडी, बजाज, आंकर, बोट, किम्बरले क्लार्क, झेब्रॉनिक्स व इतर स्मार्टफोन ब्रँड, स्मार्टफोन, लॅपटॉप, प्रिंटर, इलेक्ट्रॉनिक्स, या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करू शकतात .

अ‍ॅमेझॉन बिझनेस हे त्याच्या ग्राहकांसाठी सर्व दीर्घकालीन आणि अल्प मुदतीच्या व्यवसाय खरेदीसाठी घाऊक सवलत, अनन्य सौदे, कमी किंमतीच्या ऑफर्स, इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी जीएसटी इनव्हॉइस आणि इतर अनेक गोष्टींसाठी योजना आखत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

जॉर्ज म्हणाले की, अ‍ॅमेझॉन 26 आणि 27 जुलै रोजीच्या प्राइम डे दरम्यान लघु आणि मध्यम उपक्रम आणि स्टार्ट-अप कंपन्यांसोबत इलेक्ट्रॉनिक्स, किराणा, सौंदर्य तसेच गृह आणि स्वयंपाकघर यासारख्या श्रेणींमध्ये 2400 पेक्षा अधिक अनन्य नवीन उत्पादने सादर करणार आहे.

Amazon Prime Day Sale: Will be a big help to small entrepreneurs
LIC च्या खासगीकरणाला लवकरच होणार सुरुवात

भारतातील 450 पेक्षा जास्त शहरांमधून 75000 हून अधिक स्थानिक दुकाने यांचा अ‍ॅमेझॉन प्राइम डे सुरू होत आहेत. ग्राहक एसएमबीने देऊ केलेल्या लाखोहून अधिक उत्पादनांची खरेदी करू शकतात आणि प्राइम डेच्या दुकानदारांवर 150 रूपयांवर 10 टक्के कॅशबॅकसारख्या अनेक ऑफर मिळवू शकतात.तसेच आम्ही आमच्या विक्रेत्यांसह आमच्या ग्राहकांना व्यवसाय विशेष फायदे देण्यासाठी सातत्याने कार्य करत आहोत. आम्ही मासिक बचत कार्यक्रम - व्यवसाय मूल्य दिवस देखील चालवितो ज्यामध्ये किमान 10-12 टक्क्यांची अतिरिक्त बचत आमचे ग्राहक जासृ शकतात असे सप्ष्टीकरण अमॅझॉन बिझिनेसचे संचालक पीटर जॉर्ज यांनी दिले आहे.

दरम्यान अ‍ॅमेझॉनच्या म्हणण्यानुसार भारतात कंपनी अनेक दिवसांपासून लघू आणि मध्यम उद्योगांना मदतीसाठी काम करत असून त्याचाच एक भाग म्हणून हा अ‍ॅमेझॉन प्राइम डे असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com