ई-कॉमर्स कंपन्या फ्लिपकार्ट (Flipkart) आणि ॲमेझॉन इंडिया(Amazon India) यांनी त्यांच्या उत्सवाच्या (Festival Sale) विक्रीला यावर्षी जोरदार सुरुवात झाली असल्याचे सांगितले आहे. कारण देशातील ग्रामीण भागातून त्यासोबतच शहरांमधून मागणीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे (Amazon, Flipkart). वॉलमार्टच्या (Wall Mart) मालकीच्या फ्लिपकार्टने रविवारी सांगितले की, त्याच्या 'फ्लिपकार्ट प्लस' (Flipkart Plus)कार्यक्रमामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 40 टक्के वाढ झाली असून शहरांमधून ग्राहकांची मागणी सुमारे 45 टक्के आहे.(Amazon, Flipkart bumper sale, get a best deal)
तर अमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष मनीष तिवारी म्हणाले की, "Amazon.in वर एकाच दिवसात विक्री करणा-या विक्रेत्यांची संख्या यावर्षी 60 टक्क्यांनी वाढली आहे. आमचा महिनाभराचा महोत्सव 'अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2021' ला लाखो ग्राहकांनी अमेझॉनवर नोंदणी केलेल्या छोट्या विक्रेत्यांकडून खरेदी केली आहे. या दुकानदारांमध्ये स्थानिक दुकाने, स्टार्ट-अप आणि ब्रँड, कारागीर आणि विणकर यांचा समावेश आहे."
फ्लिपकार्टची द बिग बिलियन डेज (TBD ) हा बिग सेल 8 दिवस चालणार आहे जो 10 ऑक्टोबर रोजी संपेल, तर ॲमेझॉन इंडियाचा जीआयएफ सेल महिनाभर चालेल. याशिवाय, मिंत्रा, स्नॅपडील आणि इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही अशीच विक्री सुरू आहे.
Amazon Great Indian Festival 2021 ची विक्री 2 ऑक्टोबरपासून प्राइम ग्राहकांसाठी सुरु झाली आहे . त्याचबरोबर ही विक्री कालपासून सर्वांसाठी खुली झाली आहे . ऑक्टोबरमध्ये अॅमेझॉनची ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2021 ची विक्री गेल्या वर्षीच्या फेस्टिव्ह सीझन सेल प्रमाणेच सुमारे एक महिना चालणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.