खाजगी क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारती एअरटेलच्या (Bharti Airtel) संचालक मंडळाने रविवारी 21,000 कोटी रुपयांच्या राइट्स इश्यूला ( Airtel Rights Issue) मान्यता दिली आहे. कंपनीने शेअर बाजारांना (Stock Market) पाठवलेल्या माहितीमध्ये ही माहिती दिली असून भांडवल (Assets) वाढवण्याच्या योजनेवर कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असल्याचे समजत आहे. कंपनीने राइट्स इश्यूसाठी 535 रुपयांची पूर्ण पेड-अप इक्विटी शेअर (Equity Share) किंमत मंजूर केली असून यामध्ये 530 रुपये प्रति इक्विटी शेअरचा प्रीमियम समाविष्ट असणार आहे.(Airtel rights issue: Company board allows for right issue company will earn 21000cr rupees)
बीएसईला (BSE) दिलेल्या पत्रामध्ये एअरटेलने सांगितले की, कंपनीचा राइट्स इश्यू हा 21,000 कोटी रुपयांपर्यंत असेल.यासाठी संचालक मंडळाने संचालकांची एक विशेष समिती स्थापन केली आहे जी इश्यूच्या इतर अटी जसे की जारी करण्याचा कालावधी आणि रेकॉर्ड तारीख इत्यादी ठरवेल. एअरटेलने सांगितले की, संचालक मंडळाच्या बैठकीत उद्योगाची परिस्थिती, व्यावसायिक वातावरण, कंपनीचे आर्थिक आणि व्यवसाय धोरण यावरही चर्चा झाली.
कंपनीच्या या मोठ्या प्रमाणात निधी उभारणीच्या मोहिमेमुळे एअरटेल त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना चांगलेच आव्हान उभे करणार आहे. भारताच्या दूरसंचार बाजारात खूप स्पर्धा आहे. जगातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार बाजारपेठ आणि डेटाचा सर्वात मोठा ग्राहक, भारत आता 5G ची तयारी करत आहे. यासह, कनेक्टिव्हिटीची पातळी अधिक व्यापक होईल आणि लोकांना अल्ट्रा हाय स्पीड इंटरनेट सेवा मिळू शकेल.
सध्या, कंपनीमध्ये प्रवर्तकांची भागीदारी 55.8 टक्के आहे, तर सार्वजनिक भाग 44.09 टक्के आहे. एअरटेलच्या संचालक मंडळाने इश्यूची मुदत आणि रेकॉर्ड डेटसह इतर अटी व शर्तींवर निर्णय घेण्यासाठी संचालकांची एक विशेष समिती स्थापन केली आहे.
संचालक मंडळाच्या बैठकीत उद्योग परिस्थिती, व्यवसाय वातावरण, कंपनीचे आर्थिक आणि व्यवसाय धोरण यावर चर्चा झाली. दरम्यान, मंडळाने भांडवल उभारणीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.