अदानी ग्रुपला भारतीय विमानतळ प्राधिकरणाने फटकारले

फेब्रुवारी 2019 मध्ये वरील तीन विमानतळ चालविण्यासाठी बोली अदानी समूहाने जिंकली होती आणि त्यानंतर या तिन्ही विमानतळाचे व्यवस्थापन अदानी ग्रुपला(Adani Group) मिळाले होते
Airport Authority of India find Adani group in violation of branding
Airport Authority of India find Adani group in violation of brandingDainik Gomantak
Published on
Updated on

अदानी ग्रुपच्या(Adani Group) अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत, जानेवारीत, भारतीय विमानतळ प्राधिकरण (AII) च्या तीन समित्यांना अदानी समूहाने अहमदाबाद, मंगलूरू आणि लखनऊ विमानतळांवर ब्रँडिंग व लोगोच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्याने एएआयने अदानी ग्रुपला नोटीस बजावली होती . यानंतर या तीन विमानतळांवर काम करणार्‍या अदानी समूहाच्या कंपन्यांनी एएआयबरोबर केलेल्या सवलतीच्या कराराच्या अनुषंगाने ब्रँडिंग आणि प्रदर्शनात बदल करण्यास सुरवात केली आहे.(Gautam Adani)

यावर अदानी ग्रुपकडून 29 June जूनपर्यंत लखनौ आणि मंगलोर विमानतळांवर ब्रँडिंग आणि प्रदर्शन बदलण्याची प्रक्रिया सुरू होती आणि अहमदाबाद विमानतळावर पूर्ण झाली असून पीटीआय-भाशाकडे या प्रकरणाशी संबंधित विविध कागदपत्रे असून माहिती अधिकारांच्या प्रश्नांना उत्तर म्हणून मिळालेल्या माहितीसह ही बाब नमूद केली गेली असल्याचे सांगण्यात आले आहे.

Airport Authority of India find Adani group in violation of branding
Cryptocurrency: बिटकॉइनच्या किंमतीत झपाट्याने वाढ

फेब्रुवारी 2019 मध्ये वरील तीन विमानतळ चालविण्यासाठी बोली अदानी समूहाने जिंकली होती आणि त्यानंतर या तिन्ही विमानतळाचे व्यवस्थापन अदानी ग्रुपला मिळाले होते. त्यांनतर अदानी लखनऊ इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एएलआयएएल), अदानी मंगलगुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एएमआयएएल) आणि अदानी अहमदाबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एएआयएएल) या कंपन्यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरणाबरोबर सवलत करार केला.या कंपन्यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2020 मध्ये विमानतळ ताब्यात घेतले होते.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाला तीन विमानतळांवर डिसेंबर 2020 मधील सवलतीच्या करारानुसार ब्रँडिंग आणि प्रदर्शन आढळले. म्हणून प्रशासनाने तिन्ही कंपन्यांना पत्र लिहून 'सुधारात्मक उपाय' करण्यास सांगितले होते. तथापि, या कंपन्यांनी करारांच्या अंतर्गत ब्रँडिंगच्या नियमांचे उल्लंघन केले नाही, असे उत्तर डिसेंबरच्या उत्तरार्धात दिले. एका महिन्यानंतर एएआयने तीन विमानतळांवर सर्व होर्डिंग्ज व प्रदर्शनांचे संयुक्त सर्वेक्षण करण्यासाठी तीन स्वतंत्र समित्यांची स्थापना केली.

Airport Authority of India find Adani group in violation of branding
खाजगी कंपनींच्या कर्मचाऱ्यांनो, तुमच्या पगारात घसघशीत वाढ

यात प्रत्येक समितीचे चार सदस्य होते- विमानतळ चालवत असलेल्या अदानी समूह कंपनीचे एक कार्यकारी, केंद्र संचालित अभियांत्रिकी प्रकल्प (इंडिया) लिमिटेडचे ​​अधिकारी आणि दोन एएआय अधिकारी. समितीने आपल्या तपासणीत करारातील अटींचे उल्लंघन केल्याचे आढळले.

समितीने अदानी ग्रुपला विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अदानी समूहाचे प्रवक्ते म्हणाले, " भारतीय विमानतळ प्राधिकरणासोबत भागीदारी केल्याचा आम्हाला अभिमान आहे . एएआय आणि अदानी विमानतळ यांनी कॉमन-ब्रँडिंग आणि इतर बाबींवर विमानतळांवर परस्पर सहमती दर्शविली आहे." ते पुढे म्हणाले की, करारानुसार, प्राधिकरण आणि ऑपरेटर या दोघांचे लोगो एकाच आकारात दाखवले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com