Aadhaar Data Leak : डार्क वेबवर 81 कोटी भारतीयांचा आधार आणि पासपोर्ट डेटा लीक

Resecurity ने दावा केला आहे की, 'pwn0001' या व्यक्तीने ब्रीच फोरमवर 81.5 कोटी भारतीयांच्या आधार आणि पासपोर्टशी संबंधित रेकॉर्डची माहिती विकण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने 80 हजार डॉलर्सची मागणी केली होती.
Aadhaar and passport data of 81 crore Indians leaked on dark web.
Aadhaar and passport data of 81 crore Indians leaked on dark web.Dainik Gomantak

Aadhaar and passport data of 81 crore Indians leaked on dark web:

भारतीय नागरिकांचा आधार डेटा लीक झाल्याचं एक मोठं प्रकरण डार्क वेबवर समोर आलं आहे.

बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, अमेरिकन कंपनी रिसिक्युरिटीने दावा केला आहे की, 81.5 कोटी भारतीयांचा आधार आणि पासपोर्ट संबंधित डेटा डार्क वेबवर लीक झाला आहे.

नाव, फोन नंबर, पत्ता, आधार आणि पासपोर्टशी संबंधित माहिती ऑनलाइन विकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.

अमेरिकन फर्मने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की 9 ऑक्टोबर रोजी 'pwn0001' या व्यक्तीने ब्रीच फोरमवर एक पोस्ट शेअर केली.

यामध्ये त्यांनी 81.5 कोटी भारतीयांच्या आधार आणि पासपोर्टशी संबंधित रेकॉर्डची माहिती दिली आणि ते विकण्याचा प्रयत्न केला.

सुरक्षा अहवालानुसार, व्यक्तीने आधार आणि पासपोर्टशी संबंधित माहिती 80 हजार डॉलरमध्ये विकण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

Aadhaar and passport data of 81 crore Indians leaked on dark web.
President Draupadi Murmu Goa Visit: ताफा थांबवून राष्ट्रपती रमल्या विद्यार्थ्यांमध्ये; साधेपणाने भारावले विद्यार्थी

असे म्हटले जात आहे की, हा डेटा लीक इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चमधून (ICMR) झालेला असू शकतो. बिझनेस स्टँडर्डने वृत्त दिले आहे की, ICMR ने अद्याप यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही.

सीबीआय pwn0001 ने शोधलेल्या या डेटा लीकची चौकशी केली जात असल्याचं रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.

X या सोशल साईटवर हॅकरने 80 कोटींहून अधिक भारतीयांचा खाजगी डेटा लीक केल्याची माहिती दिली आहे.

लीक झालेल्या डेटामध्ये नाव, वडिलांचे नाव, फोन नंबर, पासपोर्ट नंबर, आधार क्रमांक आणि वयाची माहिती समाविष्ट आहे. मात्र, आतापर्यंत या डेटा लीक प्रकरणावर सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Aadhaar and passport data of 81 crore Indians leaked on dark web.
ODI World Cup: पाकिस्तान-बांगलादेश सामन्यावेळी मैदानात फडकवले पॅलेस्टिनी झेंडे, 4 जण पोलिसांच्या ताब्यात

याआधी ऑगस्टमध्ये लुसियस नावाच्या दुसर्‍या व्यक्तीने ब्रीच फोरमवर १.८ टेराबाइट डेटा विकण्याची ऑफर दिली होती.

एप्रिल 2022 मध्ये ब्रुकिंग्सच्या अहवालानुसार, नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी UIDAI ची तपासणी केली होती आणि असे आढळून आले की, प्राधिकरणाने त्यांच्या ग्राहक विक्रेत्यांचे प्रभावीपणे नियमन केले नाही आणि त्यांच्या डेटा व्हॉल्टच्या सुरक्षिततेचे संरक्षण केले नाही.

याआधीही डेटा लीकचे प्रकरण समोर आले होते. जूनमध्ये, टेलिग्राम मेसेंजर चॅनेलद्वारे CoWin वेबसाइटवरून व्हीव्हीआयपींसह लसीकरण झालेल्या नागरिकांचा वैयक्तिक डेटा कथितपणे लीक झाल्यानंतर सरकारने चौकशी सुरू केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com