8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचा 'फायनल कॉल'! 30 एप्रिलपर्यंत मेमोरँडम सादर करण्याची संधी; वेतन-भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना 'लास्ट चान्स'

8th Pay Commission Memorandum Last Date 2026: केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली.
8th Pay Commission Memorandum Last Date 2026
8th Pay CommissionDainik Gomantak
Published on
Updated on

8th Pay Commission Memorandum Last Date 2026: केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली. 8 व्या वेतन आयोगाकडे आपल्या मागण्या आणि सूचनांचे मेमोरँडम सादर करण्याच्या अंतिम तारखेबाबत गेल्या काही दिवसांपासून असलेला संभ्रम आयोगाने आता अधिकृतपणे दूर केला. आपल्या वेतन, पेन्शन आणि भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी सूचना मांडण्याची ही शेवटची संधी कर्मचाऱ्यांच्या हाती आहे. आयोगाने स्पष्ट केले की, मेमोरँडम जमा करण्याची खिडकी अजूनही उघडी असून कर्मचाऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

वेतन आयोगाच्या स्पष्टीकरणानुसार, अधिकृत वेबसाइट https://8cpc.gov.in/ वर ऑनलाइन मेमोरँडम जमा करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2026 अशी निश्चित करण्यात आली. यापूर्वी 20 एप्रिलची जी चर्चा होती, ती मुदत केवळ त्या संघटनांसाठी होती ज्यांना आयोगासोबतच्या सुरुवातीच्या वैयक्तिक बैठकांमध्ये सहभागी व्हायचे होते. सामान्य कर्मचारी आणि पेन्शनर अजूनही या पोर्टलच्या माध्यमातून थेट आयोगाशी संपर्क साधू शकतात. वाढती महागाई आणि सद्य आर्थिक स्थिती पाहता, वेतन रचनेत किती सुधारणा आवश्यक आहे, हे सांगण्यासाठी हे मेमोरँडम एक प्रभावी माध्यम ठरणार आहे. कर्मचाऱ्यांनी दिलेली मते आणि सूचना भविष्यातील वेतन आराखडा ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

8th Pay Commission Memorandum Last Date 2026
8th Pay Commission: पगारवाढीचा 'सुपर धमाका'! रिटायरमेंट फंड आणि एरियरबाबत मोठी अपडेट; बेसिक सॅलरी किती वाढणार?

आयोगाने आणखी एक आनंदाची बातमी दिली ती म्हणजे, केवळ दिल्लीतच नव्हे तर महाराष्ट्र (पुणे) आणि देशातील इतर प्रमुख राज्यांमध्येही अतिरिक्त बैठकांचे आयोजन केले जाणार आहे. यामुळे स्थानिक पातळीवरील संघटना आणि स्टेकहोल्डर्सना आपली बाजू मांडण्यासाठी अधिक संधी मिळेल. केंद्र सरकार दर 10 वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना करते, जेणेकरुन कर्मचाऱ्यांचे उत्पन्न आणि महागाई यांचा समतोल राखला जावा. 28 ऑक्टोबर 2025 रोजी केंद्रीय कॅबिनेटने या आयोगाच्या 'नियम आणि अटींना' मंजुरी दिली होती, ज्याचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणे आणि एक निष्पक्ष वेतन प्रणाली लागू करणे हा आहे.

8th Pay Commission Memorandum Last Date 2026
8th Pay Commission : पगारवाढीचा 'धमाका'! 7व्या वेतन आयोगाचे सर्व रेकॉर्ड मोडणार 8वा वेतन आयोग? महागाईला उत्तर देण्यासाठी नवा प्लॅन

जर तुम्ही सरकारी कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक किंवा एखाद्या संघटनेचे सदस्य असाल, तर 30 एप्रिलपूर्वी अधिकृत पोर्टलवर जाऊन आपले ज्ञापन त्वरित अपलोड करणे आवश्यक आहे. या तारखेनंतर ही लिंक बंद होण्याची शक्यता असल्याने भविष्यातील आर्थिक लाभांसाठी ही संधी गमावू नका. ही प्रक्रिया पूर्णतः सक्रिय असून कर्मचाऱ्यांनी (Employees) वेळेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com